मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Google Doodle च्या माध्यमातून आईसाठी मनापासून बनवा अशी खास कलाकृती
Mother's day Google doodle (Photo Credits: Google)

जागतिक मातृदिन हा संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदा मात्र या खास दिनावर कोरोना व्हायरसआणि लॉकडाऊनचे सावट असल्यामुळे आपल्या आईपासून दूर असलेल्या अनेकांना आपल्या आईसोबत हा दिवस साजरा करता येणार नाही. यासाठी गुगलने आपल्या डूडलच्या  (Google Doodle) माध्यमातून एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. ज्यात आपल्या आईला मातृदिन शुभेच्छा संदेश देण्यासाठी तुम्ही Doodle च्या माध्यमातून खास शुभेच्छा कार्ड बनवू शकता. मदर्स डे शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी कलात्मक करूया असे या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले आहे. त्यामुळे यंदा तुम्हाला तुमच्या आईसाठी ग्रीटिंग्स खरेदी करता आलं नसेल तर या डूडलच्या माध्यमातून स्वत:च्या हातांनी डिजिटल पद्धतीने बनवलेले ग्रीटिंग्स आईला भेट द्या.

या डूडल वर तुम्हाला सुरुवातीला हे ग्रीटिंग्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिसेल. ज्यात कागद, रंग, कात्री, गोंद, पेन, पेन्सिल, खोडरबर इ. वस्तू दिसतील. त्यावर क्लिक केल्यावर ते पेज लोड होईल. मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी चला काहीतरी कलात्मक करूया असा संदेश येईल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला हार्ट, फुले, स्टार्स असे अनेक पर्याय दिसतील. त्यात तुम्हाला हवा तो पर्याय निवडून तुमच्या कलात्मकतेला वाव देऊन तुमच्या प्रिय आईसाठी ग्रीटिंग बनवा. एकदा का तुमचे कार्ड बनवून झाले की तुम्ही ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून तुमच्या आईस पाठवू शकता. Happy Mother's Day 2020 Wishes: मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Images, Whatsapp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन आपल्या लाडक्या आईसोबत साजरा करा हा खास दिवस!

गुगल ची अशा पद्धतीने Doodle माध्यमातून आईला शुभेच्छा पाठविण्याची ही खूप भन्नाट कल्पना आहे. गेल्या काही दिवसांपासून Doodle वर गुगलचे खूप जुने गेम्स दिसत होते. लॉकडाऊन काळात लोकांचे मनोरंजन कऱण्यासाठी गुगल ने गेम्स आणले होते. मात्र आज मातृदिनानिमित्त गुगल ने हे खास डूडल बनवले आहे.

माध्यम कोणतेही असो मात्र आजच्या खास दिनाच्या औचित्य साधून तुमच्या आईस मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यास विसरू नका.