Flipkart Big Billion Days 2023: मोबाईल खरेदी करायचा आहे? फक्त 25 हजारांच्या बजेटमध्ये? फ्लिपकार्टवर आहेत वनप्लस, रेडमी इतरही बेस्ट मॉडेल्स
Flipkart Big Billion Days Sale | (Photo credit: archived, edited, representative image)

Online Shopping News: तुम्ही जर नवा मोबाईल खरेदी करु इच्छित असाल आणि तुमचे बजेट केवळ 25,000 रुपयांच्या आसपास असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days 2023) सेल सुरु आहे. जो 8 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये केवळ मोबाईलच नव्हे तर इतरही अनेक गोष्टी तुम्हाला घसघशीत सवलतीच्या दरात मिळत आहेत. त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर सूट मिळते आहे. आपणही त्याचा लाभ घेऊन आपल्या बजेटमध्ये अधिक किमतीचा मोबाईल सवलतीच्या दरात खरेदी करु शकता. इथे आम्ही काही मोबाइल देत आहोत. जे या सेलमध्ये अगदी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

Redmi Note 12 Pro 5G

Redmi Note 12 Pro 5G हा मोबाईल रेडमीच्या 12 सिरिजमधील आहे. जो फ्लिपकार्टवर अगदीच माफक दरात उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. या मोबाईलच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हा मोबाईल, 6 जीबी रॅम आणि 128 रोम मध्ये उपलब्ध आहे. 16.94 cm (6.67 inch) Full HD+ AMOLED Display आहे. तसेच 50MP (OIS) + 8MP + 2MP | 16MP फ्रंट कॅमेरा आहे. Lithium Polyme ची 5000 mAh इतक्या शक्तीची बॅटरी आहे. शवाय Mediatek Dimensityमध्ये 1080 प्रोसेसरही उपलब्ध आहे. सोबत एक वर्षांची मॅनिफॅक्चरर वॉरंटी तसेच इतर एक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची वॉरंटी आहे.

vivo V29e

तुमचे बजेट 25 रुपयांच्या आसपासच असेल तर vivo V29e हा एक मोबाईल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. ज्यामध्ये आहे जबरदस्त सेल्फी कॅमेरा. 8 GB RAM आणि 256 GB ROM, 17.22 cm (6.78 inch) Full HD+ Display, शिवाय 64MP + 2MP | 16MP फ्रंट कॅमेरा आणि 4600 mAh बॅटरी, 7200 Processor. सोबत एक वर्षांची मॅनिफॅक्चरर वॉरंटी तसेच इतर एक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची वॉरंटी आहे.

Motorola Edge 40

मिडियाटेक डायमेन्शन 8020 प्रोसेसरचा सपोर्ट सोबतच 4400 mAh Battery आणि 8 GB RAM, 256 GB ROM मोटोरोला एज 40 मोबाईल उपलब्ध आहे.मोबाईलमध्ये 6.55 इंचाचा P-OLED डिस्प्ले उपलब्ध आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144 Hz इतका आहे. मोबाईल फास्ट चार्जिंग होतो. त्यासाठी 68 वॅटची बॅटरीही सोबत दिली आहे. सोबत एक हेडसेट आणि सहा महिन्यांची वॉरंटी आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

वनप्लस कंपनीचा OnePlus Nord CE 3 Lite 5G हा मोबाईलही आपण खरेदी करु शकता. जो नुकताच लॉन्च झाला आहे. आपणासही हा मोबाईल आपल्या बजेटनुसार खरेदी करायचा असेल तर आपण फ्लिपकार्टच्या बिग बिलीयन डेज सेलला ऑनलाईन भेट देऊ शकता.