फेसबुक कंपनीने मार्केट रिसर्चसाठी Study App नुकतेच लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यामातून युजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर कोणत्या अॅपचा वापर करत आहे याची माहिती मिळवली जात आहे. तर महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्केट रिसर्चसाठी जमा केलेली माहिती जर फेसबुकला दिल्यास त्याबद्दल कंपनीकडून व्यक्तीला पैसे देण्यात येणार आहे.
फेसबुक कडून नेहमीच सध्याच्या ट्रेंडिंग गोष्टींबद्दल अधिकाधिका महिती जमा केली जाते. त्यानुसार फेसबुक आपल्या अॅपमध्ये सुद्धा तसे फिचर्सची सुविधा सुरु करण्याचा प्रयत्न करते. यापूर्वीच फेसबुकने हे अॅप लॉन्च केले होते. परंतु प्रायव्ही बद्दल धोका जाणवत असल्याने हे अॅप नंतर बंद करण्यात आले होते.
(Twitter Account हॅक झाल्यास काय कराल? जाणून घ्या काही सोप्या स्टेप्स)
सध्या हे अॅप प्लेस्टोरवर सुरु करण्यात आले आहे. फेसबुकने लॉन्च केलेले स्टडी अॅप हे तुम्ही कोणते अॅपचा वापर जास्त वेळा करता, किती वेळ त्यासाठी देता याची माहिती जमा करणार आहे. मात्र युजर्सचा स्मार्टफोनमधील संवेदनशील आणि फोटोची माहिती अॅपमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही आहे. त्याचसोबत युजर्सला हे अॅप वापरताना जाहीरातीसुद्धा दाखवल्या जाणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.