
आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात होत असून लहानांपासून अगदी मोठी मंडळीही सातत्याने सोशल मीडियाच्या सानिध्यात असते. सोशल मीडियाचे फायदे जितके अप्रतिम आहेत तितकेच काही तोटे देखील आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. काल (10 जून) महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले. सेलिब्रेटी ट्विटर अकाऊंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेक सेलिब्रेटी अकाऊंट हॅकिंगला सामोरे गेले आहेत.
तुमचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यास नेमके काय करावे? तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया...
# ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं समजताच support.twitter.com/forms/signin या लिंकवर जा.
# तिथे were you able to access your account? असा एक पर्याय येईल.
# त्यावेळी नो असा पर्याय निवडा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
# ड्रॉप डाऊनचा फॉर्म आला असेल तर तिथे योग्य ती माहिती भरा.
# माहिती आणि प्रश्नांची उत्तरे दिल्याने तुमचे ट्विटर अकाऊंट नियंत्रणात येईल.
# तसंच सायबर क्राईमकडं तक्रार करणे गरजेचे आहे.
ट्विटर अकाऊंट वापरता घ्यायची खबरदारी:
# लॉग इन करताना मोबाईल व्हेरिफिकेशन करा.
# लॉग इन करातना पासवर्ड सेव्ह करु नका.
ट्विटर अकाउंट हॅक झाल्यास घाबरुन, गोंधळून जावू नका. या सोप्या स्टेप्स फॉलो करा. तसंच सोशल मीडिया माध्यमांचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.