Reliance Jio मध्ये Facebook करणार 43,574 कोटींची मोठी गुंतवणूक; Global Pandemic च्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय
Facebook Investment In JIO (Photo Credits: File Image)

रिलायन्स Jio (Reliance JIO) च्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून एकत्रिक अशी मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय फेसबुक (Facebook) तर्फे घेण्यात आला आहे. यानुसार फेसबुक कंपनी जिओसोबत 9.99% च्या भागीदारीसाठी43,574  कोटोची गुंतवणूक करणार आहे. याबाबत आज, 22 एप्रिल रोजी रिलायन्स तर्फे माहिती देण्यात आली आहे. फेसबुक तर्फे जिओ प्लॅटफॉर्म वर 43,574 कोटींच्या गुंतवणूकीसाठी बंधनकारक करारावर स्वाक्षरी झाल्यावर याबाबत घोषणा केली गेली. ही गुंतवणूक फेसबुक कंपनीची आणि भारतातील परदेशी कंपनीच्या गुंतवणुकीची सर्वात मोठे उदाहरण असणार आहे. कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर, देशाचा आर्थिक कणा मजबूत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे". या गुंतवणुकीमुळे भारताला मदत करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आणि रिलायन्स सोबत काम करण्याची उत्सुकता फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, फेसबुक 5.7 बिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करत आहे, भारतीय रुपयांच्या मूल्यानुसार ही गुंतवणूक 43,574  कोटींची असणार आहे. या बदल्यात फेसबुकला रिलायन्स जिओ च्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील इक्विटी मध्ये 9.99% भागीदारी मिळणार आहे. देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढल्यानंतर Jio युजर्ससाठी मोठी ऑफर

मार्क झुकरबर्ग पोस्ट

दरम्यान, गुंतवणूकीचा मुख्य हेतू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराला चालना देणे हा सुद्धा असल्याचे फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी म्हंटले आहे. मार्क यांनी फेसबुक पोस्ट मध्ये लिहिल्यानुसार, " सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी नवीन संधी तयार करणे आणि विशेषत: भारतातील 60 दशलक्षाहून अधिक लघु उद्योगांसाठी आर्थिक बळ देणे हे आमचे ध्येय आहे. मोठ्या कंपनीत गुंतवणुकीमुळे ही कंपनी देशातील अनेकांना पुढे नोकऱ्या देऊ शकते" .