देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढल्यानंतर Jio युजर्ससाठी मोठी ऑफर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

एअरटेल, वोडाफोन-आयडिया यांच्यानंतर आता जिओ यांनी त्यांच्या प्रीपेड युजर्सची वॅलिटिडी 3 मे पर्यंत वाढवली आहे. वॅलिडिटी वाढवल्यानंतर जिओचे सध्याचे प्रीपेड ग्राहकांना जुन्या प्लॅनची वॅलिडिटी संपल्यानंतर सुद्धा इनकमिंग कॉल्सची सुविधा मिळणार आहे. जिओने असे म्हटले आहे की, याचा फायदा सर्व युजर्ससाठी होणार आहे. यापूर्वी वोडाफोन-आयडिया यांनी त्यांच्या ग्राहकांना वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी लॉकडाउनच्या काळात ज्यांना रिजार्च करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही खास ऑफर आणली होती. यापूर्वी ही ऑफर 14 एप्रिल पर्यंत होती. मात्र आता देशातील लॉकडाउन वाढवल्याने 3 मे पर्यंत कायम राहणार आहे.

तसेच एअरटेल यांनी सु्द्धा 30 मिलियन ग्राहकांची वॅलिडिटी 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व टेलिकॉम कंपन्या विविध उपाय केले जात आहेत. कंपन्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दुसऱ्या ग्राहकांच्या अकाउंटमधून रिजार्च केल्यास कॅशबॅक देत आहेत. ही कॅशबॅक ऑफर ज्या अकाउंट्सवर दिले जाते जे त्यांचा क्रमांक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिचार्ज करण्यास सक्षम नाही आहेत.(Airtel, Vodafone-Idea च्या ग्राहकांना मोठा दिलासा; प्री पेड प्लॅन्सच्या वैधतेत 3 मे पर्यंत वाढ)

उदाहणार्थ, जिओ ने गुगल प्ले स्टोरवर JioPOS Lite अॅप लॉन्च केले आहे. त्यानुसार युजर्सला दुसऱ्यांचे रिजार्च केल्यास 4 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ज्या लोकांना मोबाईलचे रिजार्च करण्यास समस्या निर्माण होत आहे त्यांच्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी बँकांची मदत घेण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. एअरटेलने नवी सुविधा सुरु केली असून ग्राहक एटीएम, पोस्ट ऑफिस, ग्रॉसरी स्टोर आणि औषधांच्या दुकानातून रिचार्ज करु शकतात.