Airtel, Idea- Vodafone Prepaid Plans (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) च्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 3  मे पर्यंत वाढ केली आहे, अशावेळी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या युजर्सची सोय व्हावी यासाठी आपल्या प्लॅन्स मध्ये बदल करण्यात सुरुवात केली आहे. यापूर्वी BSNL या सरकारी टेलिकॉम कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या वैधतेत वाढ करत असल्याची घोषणा केली होती याच प्रमाणे आता एअरटेल (Airtel), वोडाफोन- आयडिया (Vodafone- Idea) या कंपन्यांनी सुद्धा आपले या म्हणजेच एप्रिल महिन्यातील प्रीपेड प्लॅन्सची (Pre Paid Plans) वैधता 3 मे पर्यंत वाढवली आहे. खुशखबर! Airtel ने आणला 'Work From Home' करणा-यांसाठी जबरदस्त प्लान, 399 रुपयांत मिळणार 50GB डेटा

प्राप्त माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाइल युजर्संना 17 एप्रिल पर्यंत वैधता वाढवली होती. मात्र त्यानंतर आता देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा झाल्याने येत्या 3  मे पर्यंत युजर्सना आउटगोइंग कॉल सुविधा जुन्या बॅलेन्सवर वापरता येणार आहे. याआधी टेलिकॉम कंपन्यांनी एटीएम आणि मिस्ड कॉल वरून मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा दिली होती. तसेच दुसऱ्यांचे रिचार्ज करणाऱ्या युजर्संना कंपन्यांनी 4-6%ऑफ देण्यात येईल असे सांगितले होते.

दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया ने आता 30 जून पर्यंत फ्री ट्रांजेक्शन यांनी पाच पेक्षा अधिक वेळा ट्रांजेक्शन केल्यास लावण्यात येणारा अतिरिक्त शुल्क सुद्धा माफ केले आहे.दरम्यान, लॉकडाउनचा अवधी जरी वाढवण्यात आला असला तरी, सोमवार 20 एप्रिल पासून काही उद्योगांवरचे निर्बध हटवण्यात येणार आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 14 हजाराच्या पार गेला आहे मात्र सोबतच रुग्णाच्या रोज होणाऱ्या वाढीत 40 टक्क्याने घट झाली आहे.