ATM कार्डधारकांसाठी खुशखबर! 5 पेक्षा अधिक फ्री ट्रांजेक्शन केल्यास SBI शुल्क वसूल करणार नाही
SBI ATM (Photo Credits-Twitter)

जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) एटीएम कार्डधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. कारण बँकेने आता 30 जून पर्यंत फ्री ट्रांजेक्शन यांनी पाच पेक्षा अधिक वेळा ट्रांजेक्शन केल्यास लावण्यात येणारा अतिरिक्त शुल्क सुद्धा माफ केले आहे. बँकेने यासंबंधित ट्वीट करत अधिक माहिती देण्यात आली आहे. बँकेने असे सांगितले आहे की, 24 मार्चला अर्थमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेने त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, एटीएम कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यामध्ये त्यांनी 5 पेक्षा अधिक फ्री ट्राजेक्शनवरील शुल्क माफ केले आहेत.

फ्री ट्राजेक्शन म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेच्या एटीएम मध्ये गेल्यास तेथे तुम्ही खात्यातील रक्कम किंवा स्टेटमेंट तपासून पाहणे. म्हणजेच तुम्ही एटीएम मधून पैसे न काढल्यास त्याला फ्री ट्राजेक्शन म्हणत नाही. काही बँका मर्यादित फ्री ट्राजेक्शनची सुविधा देतात. मात्र जेव्हा तुमची फ्री ट्राजेक्शनची मर्यादा संपते त्यावेळी बँक त्यासंबंधित शुल्क वसूल करतात. भारतातील बँका 5-8 फ्री ट्राजेक्शनची सुविधा ग्राहकांना देतात. तर एसबीआय ग्राहकांना बचत खात्यासाठी 8 फ्री  ट्राजेक्शन दिले जातात. यामध्ये तीन ट्राजेक्शनचा उपयोग तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएम येथे करु शकता. लहान शहरांमध्ये एसबीआय 10 ट्राजेक्शनची सुविधा देते.(प्रवाशांनी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत विमानाचे तिकिट बुकिंग केले असल्यास रिफंड 3 आठवड्यात मिळणार)

दरम्यान, कोरना व्हायरस संकटाविरोधात लढल्या जाणाऱ्या लढाईत आता स्टेट बँक ऑफ इंडिया चे कर्मचारीसुद्धा मदत केली आहे.. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुमारे 2,56,000 कर्मचारी सुमारे 100 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये जमा केली. एसबीआय कर्मचाऱ्यांनी आपले दोन दिवसांचे वेतन कोविड 19 या साथिच्या आजाराविरोधात लढण्यासाठी देण्याचे जाहीर केले होते.