कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात ठेवण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन संपतो न संपतो तोच लॉकडाऊन पुढे 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केली. हे ऐकताच हे तर स्पष्ट झाले तर की अजून 18 दिवस अनेकांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरु ठेवावे लागेल. अशा वेळी आपल्या युजर्सची गैरसोय होऊ नये टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) आपल्या वर्क फ्रॉम होम करणा-यांसाठी एक जबरदस्त डेटा प्लान आणला आहे. ज्यात 399 रुपयांत युजर्सला 50GB डेटा मिळणार आहे.
एअरटेल च्या 399 रुपयाच्या प्लानसाठी ग्राहकांना एका डेटा सिम देत आहे, ज्यात त्यांना महिन्याभरासाठी 50GB डेटा मिळणार आहे. त्याशिवाय 200 रुपयांच्या प्लानमध्ये 35GB डेटा मिळत आहे. Jio, Airtel आणि Vodafone चा 50 रुपयांहून स्वस्त प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग सह मिळणार फ्री डेटा
याशिवाय 999 रुपयांच्या प्लानमध्ये एअरटेल ग्राहकांना Audio Conferencing एक्सेस सुद्धा देत आहे. याशिवाय Airtelचा 48 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची व्हॅलिटीडी मिळेल. यासोबत 38.52 रुपयांचा टॉकटाईम मिळेल. तसंच 100MB फ्री डेटा देखील मिळेल.
लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करणा-यांना कुठल्याही प्रकारची इंटरनेट संबंधीची अडचण येऊ नये यासाठी एअरटेल हे प्लान आणले आहेत.