Work From Home | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मगामारी दरम्यान लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय जगभरातील अनेक देशांनी घेतला. त्यामुळे सहाजिकच ज्यांना पर्याय उपलब्ध होता त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय निवडला. दरम्यान, जगभरातच वर्क फ्रॉम होम (Work From Home) संकल्पनेने काम करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दरम्यान, यासोबतच सायबर गुन्ह्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पुढे आले आहे. एका अहवालाचा दाखला देत आयएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सन 2021 मध्ये जगभरात 5,258 सायबर डेटा उल्लंघन (Data Breach) तक्रारी नोंदविण्यात आल्या. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मोठा आहे.

अमेरिकास्थीत वेरजॉन बिजनेस द्वारा डेटा ब्रीच इन्वेस्टिगेशन रिपोर्ट (Breach Investigation Report) (DBIR 2021) च्या 14 व्या अवृत्तीत सुरक्षेशी संबंधीत सुमारे 29,207 घटनांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात 88 देशांच्या 12 उद्योग आणि तीन जागतीक क्षेत्रात विस्तृत पीडितांसोबत 83 सहभागींद्वारा डेटा जमवून अभ्यास करण्यात आला. या अहवालातून पुढे आले की, अभूतपूर्व कमा करणाऱ्या लोकांच्या तुलनेत फिशिंग, रॅन्समवेअर (Ransomware) हल्यांचे प्रमाण अनुक्रमे 11% आणि 6% वाढल्याचे दिसून आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत मिसरिप्रजेंटेशन प्रकरणात15% वाढ झाली आहे. (हेही वाचा, Cyber Crime प्रकरणात मराठी अभिनेत्याच्या मुलास अटक; पुणे पोलिसांची कारवाई)

दरम्यान, अतिरिक्त डेटाच्या माध्यमातून पुढे आले की, 61% प्रकरणांमध्ये क्रेडेन्शियल डेटा (Credential Data) समाविष्ठ आहे. क्रेडेन्शियल स्टफिंग हल्ल्यांमुळे पीडित सुमारे 95% संघटनांनी वर्षाकाठी 637 आणि 3.3 अब्ज दुर्दैवी लॉगिन प्रयत्नांचा सामना केला. वेरिजॉन बिजनेसचे सीईओ टॅमी इरविन यांनी एका प्रतिक्रियेत म्हटले की, कोविड 19 महामारीत वर्तमान काळात अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करणाऱ्या संघटनांवर मोठा परिणाम झाला आहे. इरविन यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या पद्धतीने बिजनेस-क्रिटिकल फक्शन क्लाऊड पर स्विच करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढते आहे, त्याच प्रमाणात त्यांच्या सुरक्षेवरही मोठा धोका निर्माण होत आहे. कारण सुरक्षेत घुसखोरी करणाऱ्या हॅकर्सना मानवीय मर्यादांचा फायदा ऊठवणे आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर वाढत्या अवलंबित्वाचा फायदा घेणे सोपे जाते.