Cyber Crime | Representational Image | (Photo Credits: Pixabay)Crime

बँक खातेधारकांची गुप्त माहिती (डेटा) चोरी करुन तो विक्री करण्याचा घाट घालण्याचा कट पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने हाणून पाडला आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले आहे. यात मराठी कलाकार असलेल्या रवींद्र मंकणी (Ravindra Mankani) यांचे सुपुत्र रोहन मंकणी (Rohan Mankani) यांचाही समावेश असल्याचे समजते. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केल्याने बँक ग्राहकांचे कोट्यवधी रुपये वाचल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही काळापसून सायबर गुन्हेगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामळे पोलीसही सतर्क झाले असून वेळीच कारवाई करताना दिसत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात तब्बल 25 लाख रुपये घेऊन डेटा खरेदी करताना 10 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी 4 जण हे नामांकित कंपनीमध्ये कार्यरत असल्याचेही समजते. यात भाजप चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष तसेच अभिनेता रविंद्र मंकणी यांचा मुलगा रोहण मंकणी यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. रविंद्र मंकणी हे अनेक टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचले आहेत. स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा काही त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. निवडुंग, स्मृतीचित्रे, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा काही चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या आहेत. (हेही वाचा, Mumbai: बनावट लोन अॅपच्या माध्यमातून लोकांना 2 लाखांचा गंडा, पोलिसांकडून चार जणांना अटक)

दरम्यान, 37 वर्षीय रोहन मंकणी यांची ट्विटरवरील ओळख राजकीय विश्लेषक आणि सल्लागार अशी आहे. ते फूड अँड वाईन इव्हेंट्सचे आयोजन करतात. तसेच अभिन क्षेत्रातही त्यांचा वावर पाहायला मिळतो. पुणे येथील सहकारनगर भागात ते वास्तव्यास असतात.

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने वेळीच कारवाई केल्याने बँक ग्राहकांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचल्याचे सांगितले जात आहे.