सॅमसंग पाठोपाठ आता अॅप्पल (Apple) कंपनी सुद्धा लवकरच बाजारात आपला फोल्डेबल आयफोन (iPhone) आणण्याच्या तयारीत आहे. या आयफोनवर सध्या कंपनीची तज्ज्ञ टीम काम करत असून लवकरच हा आयफोन बाजारात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्टनुसार, हा अॅप्पलचा फोल्डेबल आयफोन स्टायलस सपोर्टसह येऊ शकतो. यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहकांसह भारतीय ग्राहकांमध्येही या फोल्डेबल आयफोनची प्रचंड उत्सुकता आहे. हा आयफोनचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, Apple ब्रांड एक Ceramic Sheild ग्लासचा वापर केला असेल. ज्यामुळे हा आयफोन फोल्ड वा अनफोल्ड झाल्यानंतरही त्याची स्क्रीन केमिकली नीट असेल.हेदेखील वाचा- Reliance Jio युजर्ससाठी खुशखबर; रिचार्जवर मिळणार 1000 रुपयांची बक्षीसं
याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, रिपोर्टनुसार, या आयफोनमध्ये 7.3 इंच ते 7.6 इंचाच्या दरम्यान स्क्रीन असू शकते. यात OLED डिस्प्ले सुद्धा असू शकते. आयफोन्सच्या अन्य फोन्सच्या तुलनेत याची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. हा आयफोन 2023 पर्यंत लाँच केला जाऊ शकतो. याच्या किंमतीविषयी कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Apple कंपनीने iPhone स्मार्टफोन ट्रॅकिंग करणे अधिक मुश्किल करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. कंपनी मार्च-एप्रिल पर्यंत या संदर्भातील एक नवी प्रायव्ही कंट्रोल आणू शकते. या प्रायव्हसी कंट्रोलला गेल्याच वर्षात आणण्याची तयारी केली गेली होती. पण चहूबाजूंनी दबावानंतर कंपनीने ती पुढे ढकलली. खरंतर फेसबुक सह अन्य काही डिजिटल सर्विस देणारे अॅप जाहिरांतींसाठी युजर्सला ट्रॅक करतात. पण नवी प्रायव्हसी कंट्रोल लागू केल्यानंतर कोणत्याही अॅप्पल फोनला ट्रॅक करण्यासाठी युजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. नवी प्रायव्हसी संदर्भात अॅपल आणि फेसबुक मध्ये सध्या वाद सुरु आहेत. गेल्या महिन्यात फेसबुकने न्यूयॉर्क टाइम्सच्या वॉल स्ट्रिट जर्नल सह काही वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देत या बद्दल आलोचना केली होती.