
रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनव्या ऑफर्स सादर करत असतात. युजर्संना स्वस्त दरात डेटा (Data), कॉल (Call) आणि एसएमएस (SMS) ची सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन ऑफर्स सादर केले जातात. यातच आता जियो ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज ऑफर सादर केली आहे. 16 फेब्रुवारीपासून या ऑफरला सुरुवात होणार झाली असून 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकाल. परंतु, त्यासाठी तुम्हाला जिओच्या अॅप किंवा वेबसाईटवरुन नाही तर पेटीएम, फोनपे, अॅमेझॉन या माध्यमातून रिचार्ज करावा लागेल. जिओ ग्राहकांना या प्लॅटफॉर्म्स वरुन रिचार्ज केल्यास कॅशबॅक किंवा बक्षीस देण्यात येणार आहे. जाणून घेऊया या रिचार्ज ऑफर बद्दल...
Paytm ऑफर:
लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम ने टेलीकॉमच्या सर्व ग्राहकांना रिचार्ज ऑफर देण्यासाठी रिलायन्स जिओ सोबत टायअप केले आहे. जिओच्या प्रीपेड युजर्संना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल. तर जुन्या ग्राहकांना 100 रुपयांची बक्षीसं मिळतील. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पेटीएमवरुन कमीत कमी 48 रुपायंचा रिचार्ज करावा लागेल. बक्षीस रुपाने कूपन किंवा स्क्रॅच कार्ड मिळेल. ज्याचा वापर तुम्ही शॉपिंग किंवा इतर दुसऱ्या कामांसाठी करु शकाल.
PhonePe ऑफर:
PhonePe वरुन जिओ रिचार्ज केल्यास 140 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि 260 रुपयांचा स्क्रॅच अँड विन रिवॉर्ड मिळेल. 140 रुपयांचा कॅशबॅक दोन भागात मिळेल. पहिला 80 रुपये आणि दुसरा-तिसरा 60-60 रुपयांचा मिळेल. तसंच नव्या, जून्या सर्वच ग्राहकांना पहिल्या रिचार्जवर 120 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. परंतु, ही ऑफर युपीआय आयडी वरुन रिचार्ज केल्यावरच लागू होईल. फोनपे च्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 125 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
Amazon ची ऑफर:
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन रियान्सस जिओच्या नव्या आणि जून्या ग्राहकांना 125 रुपयांचे बक्षीस देत आहे. याचा उपयोग तुम्ही शॉपिंग किंवा बील भरण्यासाठी करु शकता. (Reliance Jio च्या 155 रुपयांच्या रिचार्ज मध्ये युजर्सला मिळणार 1GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग)
मोबिक्विक ऑफर:
मोबिक्विक रिलायन्स जिओच्या प्रीपेड ग्राहकांना अनेक रिचार्ज ऑफर्स दिले जात आहेत. पहिला ऑफर मोबिक्विक 149 रुपये किंवा त्याहून अधिकच्या रिचार्जसाठी UPI ने पेमेंट केल्यास मिळेल. UPI रिचार्जवर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. त्यात अधिकतर कॅशबॅक 50 रुपयांचा आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ‘NJIO50’ कोड टाकावा लागेल. त्याचबरोबर ‘JIO50P’ कोडसह ग्राहकांना 50 टक्के म्हणजेच 100 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल. (Jio All In One Plans: जिओचे ऑल इन वन प्लॅन्स सादर; पहा काय आहेत ऑफर्स)
Freecharge ऑफर:
नव्या जिओ युजर्संना फ्रीचार्जवरुन रिचार्ज केल्यास 30 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तर जुन्या ग्राहकांना 20 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 30 रुपयांचा कॅशबॅक मिळण्यासाठी ‘JIO30’ हा कूपन कोड टाकावा लागेल तर 20 रुपयांचा रिचार्ज मिळण्यासाठी ‘JIO20’ हा कूपन कोड टाकावा लागेल.
यामधील कोणती ऑफर अधिक सुयोग्य आहे त्यानुसार युजर्स तिचा लाभ घेऊ शकता.