Jio All In One Plans: जिओचे ऑल इन वन प्लॅन्स सादर; पहा काय आहेत ऑफर्स
Reliance Jio (Photo Credit: Facebook)

आपल्या युजर्संना खुश करण्यासाठी आणि नव्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio) नवनवे प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) सादर करत असते. आता नवा ऑल इन वन (All In One) प्लॅन जिओने ग्राहकांसाठी सादर केला आहे. यात 75 रु, 125 रु, 155 रु, 185 रुपयांच्या चार प्लॅन्सचा समावेश आहे. या चारही प्लॅन्समध्ये कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत? तसंच याची व्हॅलिडिटी काय? याची माहिती घेऊया... (Reliance Jio चा धमाकेदार वार्षिक प्लान! 2599 रुपयात मिळणार 740GB डेटा)

75 रुपयांचा प्लॅन:

यात 3 जीबी डेटा देण्यात येणार असून अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसंच 50 एसएमएस फ्री पाठवता येणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असून यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

125 रुपयांचा प्लॅन:

यात 14 जीबी डेटा देण्यात येणार असून अनलिमिडेट व्हाईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसंच 300 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.

155 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये 28 जीबी डेटा म्हणजे दिवसाला 1 जीबी डेटा देण्यात येणार आहे. 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिडेट व्हाईस कॉलिंग देण्यात येणार आहे. प्लॅनची 28 दिवसांच्या व्हॅलिडीटी असून जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाईल.

185 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये एकूण 56 जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच दिवसाला 2 जीबी. इतर प्लॅन्सप्रमाणे यातही अनलिमिटेड कॉलिंग, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन आणि 100 डेली फ्री एसएमएस ची सुविधा मिळेल. याचीही व्हॅलिडीटी 28 दिवासांची आहे.

प्रीपेड युजर्संना नव्या प्लॅन्सचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे आवडीचा आणि सोयीचा प्लॅन घेऊन युजर्स त्यात मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.