
सध्या एअरटेल (Airtel), व्हिआय (VI) सारख्या सर्वच कंपन्यांची रिलायन्स जिओसोबत (Reliance Jio) जोरदार स्पर्धा सुरु आहे. भारतीय बाजारात टिकून राहण्यासाठी या टेलिकॉम कंपन्यां एकाहून एक सरस प्लान्स आणत आहे. याच्या माध्यमातून ते अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. त्यात रिलायन्स जिओने पुन्हा एका या कंपन्या जोरदार टक्कर देण्यासाठी आपला वार्षिक प्लानमध्ये जबरदस्त बेनिफिट्स दिले आहेत. रिलायन्स जिओच्या 2599 रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये (Annual Plan) 740GB डेटा उपलब्ध केला जाणार आहे.
रिलायन्स जिओच्या 2,599 रुपयाच्या वार्षिक प्लानची वैधता 365 दिवस असेल. यात तुम्हाला दर दिवसा 2GB डेटा मिळतो. त्याचबरोबर त्यात आता 10GB चा अतिरिक्त डेटा सुद्धा मिळत आहे. याचाच अर्थ तुम्हाला एकूण 740GB हाय-स्पीड डेटा मिळत आहे. यात दर दिवशी मिळणारा डेटा संपल्यानंतर तुमच्या नेटचा स्पीड कमी होऊन 64Kbps राहिल.हेदेखील वाचा- प्रतिक्षा संपली! Flipkart दिसली Poco M3 स्मार्टफोनची पहिली झलक , 'या' दिवशी होणार भारतात लाँच
याशिवाय या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर दिली जात आहे. तसचे देशभरातील सर्व लोकल आणि एसटीडी कॉल मोफत मिळत आहेत. त्याचबरोबर यात वार्षिक प्लानमध्ये प्रति दिन 100 SMS मोफत मिळत आहेत. त्याचबरोबर या प्लानमध्ये जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ म्यूजिक सारखे अॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळत आहेत.
रिलायन्स जिओ 2599 रुपयाच्या या वार्षिक प्लानमध्ये ग्राहकांना डिज्नी+हॉटस्टारचा देखील आनंद घेऊ शकता. जिओच्या या प्लानमध्ये कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता 1 वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टार ची मोफत मेंबरशिप मिळते.
या वार्षिक प्लान व्यतिरिक्त 2000 रुपयांच्या वर असलेले आणखी दोन रिलायन्स जिओ प्लान्स आहेत. एक 2399 आणि 4,999. यातही ग्राहकांना जबरदस्त बेनिफिट्स देण्यात आले आहेत. दरम्यान Reliance Jio च्या 599 रुपयांच्या नवा एक प्लॅन आणला आहे. ज्यात युजर्सला प्रति दिन 2GB डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. त्यामुळे वॅलिडिटी दरम्यान युजर्सला एकूण 168GB हाय स्पीड डेटाचा लाभ घेता येणार आहे. डेली हाय स्पीड डेटाची लिमिट संपल्यानंतर त्याची स्पीड कमी होत 64kbps होणार आहे.तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये डेटाच्या व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळणार आहे. यामध्ये 100 डेली एसएमएस ही दिले जाणार असून जिओ अॅप्सचे फ्री मध्ये सब्सक्रिप्शन ही मिळणार आहे