प्रतिक्षा संपली! Flipkart दिसली Poco M3 स्मार्टफोनची पहिली झलक , 'या' दिवशी होणार भारतात लाँच
Poco M3 (Photo Credits: Filpkart)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco ने आपला नवा स्मार्टफोन Poco M3 भारतात कधी लाँच करणार याची अधिकृत घोषणा केली आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. यात या स्मार्टफोनची पहिली झलक पाहायला मिळेल. येत्या 2 फेब्रुवारीला हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल असेही फ्लिपकार्टवरून सांगण्यात आले आहे. फ्लिपकार्टवर याचा फर्स्ट लूक पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. आकर्षक डिस्प्ले, कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी अशी खास वैशिष्ट्ये यात देण्यात आली आहे.

येत्या 2 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर Poco M3 स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे कास वैशिष्ट्य म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.हेदेखील वाचा- WhatsApp अकाऊंट कम्प्यूटरला लिंक करण्यासाठी Fingerprint आणि Face ID नवं फिचर सादर

Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 4GB आणि 6GB रॅम देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची भारतात किंमत 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाची FHD+ डिस्प्ले पॅनल देण्यात आले आहे. त्याचबरोबर 60Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले असेल. या डिस्प्ले मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईन पाहायला मिळेल. हा फोन Qualcomm Snapdragon 662 SoC सह येतो. तसेच हा Android 10 बेस्ड MIUI 12 असू शकतो. यात 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे. जी तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 512GB पर्यंत वाढवू शकतो.

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP चा मॅक्रो सेंसर दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 18W चा USB Type C फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ब्लूटुथ 5.0 दिला गेला आहे.