Who Was Rohini Paradhye? सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आणि 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकिणीचा धक्कादायक अंत

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार आणि 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Who Was Rohini Paradhye? सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आणि 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकिणीचा धक्कादायक अंत

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या साध्या, हसऱ्या आणि ग्रामीण शैलीतील अभिनयाने लाखो नेटीझन्सच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध मराठी रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी राहत्या गावी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे त्यांच्याच मालकीच्या 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे सोशल मीडिया वर्तुळात आणि त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोण होत्या रील स्टार रोहिणी पाराध्ये

रोहिणी पाराध्ये या सोशल मीडियावरील एक अत्यंत लोकप्रिय चेहरा होत्या. त्यांचे आणि पती निलेश पाराध्ये यांचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ब्रह्मपुरी येथे 'हॉटेल ग्रामपंचायत' नावाचे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलच्या व्यवसायासोबतच हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते.

इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे ग्रामीण जीवनशैली, कौटुंबिक विषय आणि महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती यावर आधारित रील्स अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या साध्या, कौटुंबिक आणि विनोदी व्हिडिओंना नेटीझन्सची मोठी पसंती मिळत होती, ज्यामुळे त्यांनी अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2026 11:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).