Bullet Train Project: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मोठा टप्पा पार! महाराष्ट्रात तिसऱ्या बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण
ताज्या बोगद्याच्या प्रकल्पाचे यश महाराष्ट्रातील यापूर्वी साध्य झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर आधारलेले आहे. 2 जानेवारी 2026 रोजी पालघर जिल्ह्यातच, सफाळे परिसरात दीड कि.मी. लांबीच्या MT-05 या डोंगरातील बोगद्याचे निर्मिती काम यशस्वीपणे करण्यात आले.
अभियांत्रिकीच्या क्षेत्रातला मैलाचा टप्पा मानले जाणारे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक, अशा डोंगरातील तिसऱ्या बोगद्याच्या निर्मितीचे (एमटी-07) काम महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात, आंबेसरी गावात यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या यशासह, गेल्या पाच महिन्यात, महाराष्ट्रांत डोंगरातल्या तीन बोगद्यांचे निर्मिती कार्य पूर्ण झाले असून, त्यातून देशांतील पहिल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठीच्या, तंत्रज्ञान दृष्ट्या आव्हानात्मक अशा विभागाच्या कामातील जलद वेग यातून दिसून येतो आहे. नव्याने निर्मिती झालेला डोंगरातील हा बोगदा, एमटी -07, 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर्स रुंद असून त्यात बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन मार्गिका आहेत. डोंगराच्या दोन्ही बाजूंना नियंत्रित खोदकाम आणि स्फोट घडवून, हा बोगदा खणण्यात आला, त्यासाठी अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले आहे.
या संपूर्ण खोदकाम प्रक्रियेत, अत्यंत आधुनिक अशी देखरेख व्यवस्था आणि भू-तंत्रज्ञान उपकरणे वापरण्यात आली होती, जेणेकरुन, संरचनात्मक स्थैर्य, कामगारांची सुरक्षितता आणि अचूकता जपण्यात आली. या कामाच्या वेळी कामगारांच्या सर्वसमावेशक सुरक्षितता उपाययोजनांचे पालन करण्यात आले होते, त्याशिवाय, अग्निशमन सुरक्षा व्यवस्था, नियंत्रित प्रवेश आणि सातत्याने भू-तंत्रज्ञान देखरेख ठेवली जात होती.
याआधी महाराष्ट्रात बोगदा निर्मितीची झालेली यशस्वी कामे:
या महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हा डोंगरातील पहिला यशस्वी बोगदा ठरला. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2026 रोजी MT-06 या 454 मीटर लांबीच्या बोगद्याचे निर्मिती कामही यशस्वी झाले. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने खोदण्यात आला होता. यामुळे, अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात दोन बोगद्यांचे निर्मिती काम, यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
Mumbai-Amdavad Bullet Train Project achieves another milestone 🇮🇳
🛤️ 3rd mountain tunnel breakthrough in Maharashtra within 5 months.
📍Dahanu Taluka, Palghar pic.twitter.com/vhZcU4vgmP
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 2, 2026
महाराष्ट्रांत बांधकाम सुरु असलेल्या सात पर्वतीय बोगद्याच्या कामांपैकी, एमटी-05, एमटी-06 आणि एमटी-07 यांचे निर्मिती काम पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण आठ पर्वतीय बोगदे असून त्यातील, सात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सात बोगदे असून एक गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे, तिथले बोगद्याचे काम या आधीच पूर्ण झाले आहे.वापी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यानच्या सर्व तीन डोंगरातील बोगद्यांची खोदकामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका, महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातच्या वापी दरम्यानच्या महत्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जाते. या विभागात बांधकाम झपाट्याने प्रगतीपथावर आहे. बोईसर–वापी दरम्यानच्या मार्गावर तीन पर्वतीय बोगदे (MT-08, MT-07 आणि MT-06) आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

