iphone (Photo Credits: File Photo)

इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक नवे सपोर्ट डॉक्युमेंट जाहीर केले आहे. ज्यामध्ये कंपनीने iOS 9 आणि त्या खालील वर्जनच्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये सपोर्ट करणे बंद करण्याबद्दल सांगितले आहे. त्यात फक्त iOS 10 आणि अपग्रेडेड वर्जन iPhone आणि अन्य Apple डिवाइसचे एन्क्रिप्टेड चॅट्स सर्विस WhatsApp एक्सेस करता येणार आहे. म्हणजेच युजर iPhone 5 आणि त्यानंतरच्या मॉडेलमध्येच WhatsApp चालवू शकतात. परंतु iPhone 4S युजर्सला त्याचा वापर करता येऊ शकणार नाही.(Twitter मध्ये लवकरचं येत आहे नवीन फिचर; आता ट्विटमध्येचं पाहू शकता YouTube व्हिडिओ)

Apple कंपनीने असे म्हटले होते की, 81 टक्के आयफोन युजर iOS 14 वर आधारित आहेत. तर 17 टक्के आयफोन युजर iOS 13 बेस्ड आहेत. याचा अर्थ फक्त 2 टक्के युजर्स iOS12 वर काम करतात. गेल्या वर्षात फेसबुकचे मालकी हक्क असलेल्या मॅसेजिंग सर्विसने iOS 8 आणि त्यावरील वर्जनमध्ये एन्क्रिप्टेड मेसेज सपोर्ट बंद केले होते. WhatsApp कडून नव्या पासवर्ड प्रोटेक्डेट एन्क्रिप्ट बॅकअप फिचरवर काम केले जात आहे. जे क्लाउट स्टोरेज आहे. WhatsApp चॅट अॅन्ड टू अॅन्ड एन्क्रिप्टेड आहे. परंतु हे प्रोटेक्शन सध्याच्या ऑनलाईन बॅकअपवर लागू होत नाही. जो Google Drive आणि Apple iCloud वर स्टोरेज असतात. (Alert! तुम्ही सुद्धा Google Incognito मोडचा वापर करत असाल तर व्हा सावध)

एका अन्य रिपोर्टमध्ये WhatsApp आयर्काव चॅप सेलला नवे युजर इंटरफेस मिळू शकतो. हा आर्काइव चॅट सर्वात टॉप वर पिन असणार आहे. WhatsApp डेस्कटॉप युजरला नुकत्याच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगला सपोर्ट दिला गेला आहे. युजरला नवा व्हिडिओ आणि कॉल ऑप्शन व्यक्तिगत चॅटसाठी मिलणार आहे. WhatsApp  कडून नुकत्याच नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार रिमांडर पाठवणे सुरु केले आहे. तर 15 मे पर्यंत नवी प्रायव्हेसी पॉलिसी स्विकार करावी लागणार आहे.