ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर 22 ऑगस्ट पासून Apple Days Sale ला सुरुवात झाली आहे. हा सेल येत्या 25 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलसाठी अॅप्पलने त्यांच्या काही निवडक iPhone च्या किंमतीत घट केली आहे. सेलमध्ये या वर्षात एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आलेल्या iPhone SE (2020) च्या किंमतीत सुद्धा घट केली असून विक्रीसाठी तो उपलब्ध करुन दिला आहे. या व्यतिरिक्त सेलमध्ये iPhone XR ची किंमत सुद्धा कमी केली आहे.(आयफोन निर्माता Apple बनली 2 ट्रिलियन डॉलर्स मार्केट व्हॅल्यूपर्यंत पोहोचणारी पहिली अमेरिकन कंपनी)
Apple Days sale मध्ये iPhone SE स्मार्टफोनमधील 64GB मॉडेल 35,999 रुपये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच 128GB मॉडेल 40,999 रुपये आणि 256GB मॉडेल 50,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. पण लॉन्चिंगच्या वेळी iPhone SE च्या 64GB मॉडेलची किंमत 42,500 रुपये, 128GB ची 47,800 आणि 56GB मॉजेल 58,300 रुपये होता. फोन खरेदीवर ग्राहकांना 13,450 रुपयांचा एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जाणार आहे. सेलमध्ये Apple iPhone XR स्मार्टफोनमधील 64 GB ची किंमत 45,999 रुपये आणि 128GB मॉडेल 51,999 रुपये आहे. iPhone 11 bj 5 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या सूटचा फायदा HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड धारकांना होणार आहे. डिस्काउंटनंतर फोनमधील 64 जीबी मॉडेल 63,300 रुपये आणि 128 जीबी मॉडेल 68,600 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टकडून iPhone खरेदीवर 13,450 रुपयांचा एक्सचेंज आणि 5,667 रुपये प्रतिमहिना नो-कॉस्ट EMI ऑप्शन सुद्धा दिला जाणार आहे.(Google बंद करणार पॉप्युलर सर्विस, 1 ऑक्टोंबर पूर्वी करा हे काम)
iPhone SE आणि iPhone XR हे दोन्ही स्मार्टफोन iOS 13 वर काम करतात. iphone SE (2020) मध्ये 4.7 इंचाचा रेटिना एचडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचे रेजोल्यूशन 750X1334 पिक्सल आहे. तर iPhone XR स्मार्टफोन मध्ये 6.1 इंचाचा लिव्किड रेटिना एचडी (828X1792) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये पिक्सल डेनसिटी 326ppi आहे. तर फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी iPhone SE 2020 आणि iPhone XR दोन्ही मध्ये सिंगल 12 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास iPhone SE मध्ये 13 तासांचा व्हिडिओ प्ले बॅक, 8 तासांचा व्हिडिओ स्ट्रिमिंग आणि 40 तासांपर्यंत ऑडिओ प्ले बॅक मिळतो. तर iPhone XR एकदा चार्ज केल्यानंतर 16 तास व्हिडिओ स्ट्रिमिंग आणि 64 तासांपर्यंत ऑडिओ प्ले करु शकतो.