Google बंद करणार पॉप्युलर सर्विस, 1 ऑक्टोंबर पूर्वी करा हे काम
गुगल (Photo Credit: Getty)

गुगल (Google) कडून त्यांची पॉप्युलर Google Play Music सर्विस बंद करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गुगल प्ले म्युझिक सर्वात प्रथम न्युझीलँड, साउथ अफ्रिका सारख्या देशात सप्टेंबर महिन्यातच बंद होणार आहे. त्यानंतर अन्य देशात सुद्धा ही सर्विस येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून बंद केली जाणार आहे. कंपनीच्या मते, डिसेंबर पर्यंत ही सर्विस पूर्णपणे बंद केली जाणार आहे. यानंतर युजर्सला Google Play Music वरील कंन्टेंटचा वापर करता येणार नाही आहे. त्यामुळे 1 ऑक्टोंबर पूर्वी अॅपवरील डेटा सुरक्षित करण्याचा सल्ला युजर्सला देण्यात आला आहे. गुगलने असे आवाहन केले आहे की, सप्टेंबर महिन्यानंतर कंपनी या सर्विससाठी कोणत्याही पद्धतीचे पेमेंट स्विकार करणार नाही आहे. त्याचसोबत युजर्सला याचा Play Store वरुन सुद्धा वापर करता येणार नाही आहे.

The Verge यांच्या रिपोर्ट्सनुसार, गुगलने आता फक्त Youtube Music सर्विस सुरु ठेवणार आहे. त्याचसोबत गुगलकडून गुगल प्ले म्युझिकच्या बदल्यात युट्युब म्युझिक सर्विस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गुगलकडून काही महिन्यांपूर्वीच गुगल प्ले म्युझिक सर्विस सुरु करण्यात आली होती. कंपनीनेच्या मते युट्युब म्युझिकचे युजर इंटरफेसचा वापर करणे अगदी सोपे आहे. हे एकदम गुगल म्युझिक प्रमाणे आहे. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच युट्युब म्युझिक अॅप सुरु केल्यास तेथे काही गोष्टी सारख्याच दिसून येणार आहेत. कंपनीने नुकताच युट्युब म्युझिक मध्ये ट्रान्सफर टूल उपलब्ध करुन दिले असून जे अगदी गुगल प्ले म्युझिक प्रमाणेच आहेत.(Google Pixel 4a Launched: पंच होल डिस्प्ले डिझाइन असलेला गुगल पिक्सल 4 ए झाला लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

गुगलच्या मते त्यांच्याकडून यापूर्वी काही वेळा गुगल प्ले म्युझिक बंद करण्याची नोटीस जाहीर केली होती. कंपनीच्या नुसार ही सर्विस तो पर्यंत बंद नाही करु शकत जो पर्यंत युजर्सकडून त्याचा वापर करण्यात येत आहे. जर युजर अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड असलेला नवा स्मार्टफोन खरेदी करत असल्यास त्यांना गुगल प्ले म्युझिकच्या जागी युट्युब म्युझिक अॅप प्री-इंस्टॉल केलेले मिळणार आहे.