कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन कंपनीना मोठा फटका बसला होता. मात्र, हळूहळू कोरोनाची परिस्थिती नित्रंत्रणात येऊ लागल्याने बऱ्याच स्मार्टफोन कंपनी पुन्हा एकदा बाजारात उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुगलचा (Google) नवीन स्मार्टफोन गुगल पिक्सल 4 ए (Google Pixel 4a) लॉन्च झाला आहे. या नवीन स्मार्टफोनद्वारे गुगल कंपनी ऍपलचा स्मार्टफोन आयफोन एसई 2020 स्मार्टफोनला टक्कर देण्याचा प्रयत्न करीत आहे. आयफोन एसई 2020 स्मार्टफोन गेल्या काही महिन्यांपूर्वी बाजारात आला होता. मात्र, त्यावेळी कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे गुगलला ‘गुगल I/O’ हा इव्हेंट रद्द करावा लागला होता.
अमेरिकेमध्ये हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला असून 20 ऑगस्टपासून गुगल स्टोअर, अॅमेझॉन आणि अन्य काही स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र, भारतात ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्लिपकार्टद्वारे या फोनच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. अद्याप या फोनच्या भारतातील किंमतीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. अमेरिकेत गुगल 4 ए स्मार्टफोनची किंमत 349 डॉलर म्हणजेच 26,300 रुपये इतकी असणार आहे. गुगल पिक्लल 4ए केवळ एका रंगात म्हणजे ब्लॅक रंगात उपधब्ध असणार आहे. गुगल पिक्सल 3 ए च्या तुलनेत या स्मार्टफोनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्वात मोठा बदल फोनच्या डिस्प्लेमध्ये झाला असून नवीन फोनमध्ये कंपनीने होल-पंच डिझाइनचा वापर केला आहे. हे देखील वाचा-भारतात लाँच झाले वायरलेस ईअरबड्स ITW-60; याची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
Google Pixel 4a : Google चा स्वस्त Smartphones Pixel 4a झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स : Watch Video
याशिवाय, रेडमी नोट 4 स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर उपलब्ध झाले होती. ही एक प्लॅश सेल होती. यामुळे मागच्या सेलसारखे यावेळी शाओमी रेडमी नोट 4 लवकरच आउट ऑफ स्टॉक झाले आहेत. तसेच रेडमी 4 आणि रेडमी 4 ए हे दोन्ही स्मार्टफोन अमेझॉनच्या पुढच्या सेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा सेल 20 आणि 22 जून आयोजित करण्यात येणार आहे.