ऍपल कंपनीचा सर्वात स्वस्त iPhone होणार लवकरच लाँच; जाणून घ्या काय असतील याचे फीचर्स
iPhone (फोटो सौजनय- ट्विटर)

Cheapest iPhone Price: मोबाईल कंपन्यांमध्ये ऍपल या ब्रँडच्या फोनची किंमत नेहमीच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसते. आणि त्यामुळेच सामान्य जनता आयफोन खरेदी करण्याकडे पाठ फिरवताना दिसते. परंतु, आता तुम्हीही हा आयफोन सहज विकत घेऊ शकता कारण ऍपल कंपनी लवकरच त्यांचा सर्वात स्वस्त फोन (Cheapest iPhone to launch) लाँच करणार आहे. iPhone 9 असं या फोनचे नाव आहे.

चला तर पाहूया या फोनचे काय असतील फीचर्स 

आयफोन 9 मध्ये देखील नवीन आयफोन 8 प्रमाणे 4.7 इंचाचा LCD डिस्प्ले, Touch ID ने होम बटन दिले आहे. परंतु, यामध्ये 3.5 mm हेडफोन जॅक नसेल. विशेष म्हणजे हा नवा आयफोन A13 बायॉनिक चीपसेटवर चालणार आहे. कारण लेटेस्ट  iPhone 11 मध्ये या चीपचा वापर करण्यात आला आहे. तसेच iPhone 9 लेटेस्ट iOS 13 वर ऑपरेट होणार आहे.

स्टोरेजचा विचार करता iPhone 9 फोनमध्ये 3GB रॅम असणार आहे. त्याचसोबत फोनच्या मॉडेलमध्ये इंटरनल स्टोअरेजचे दोन व्हेरिअंट 64GB आणि 128GB बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Samsung Carnival: फ्लिपकार्टवर 34 हजार रुपयांपर्यंतच्या सॅमसंगच्या स्मार्टफोनवर मिळतेय दमदार सूट

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्वात स्वस्त असणारा हा आयफोन नक्की बाजारात किती रुपयांना उपलब्ध असेल. तर आनंदाची बातमी म्हणजे 2020 मध्ये जानेवारी ते मार्चच्या दरम्यान ऍपल कंपनी कडून हा फोन लाँच करण्यात येऊ शकतो. या फोनची बाजारात किंमत 399 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 28 हजार इतकी असेल. आणि विशेष म्हणजे हा फोन सर्वात स्वस्त असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून मागणी असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.