Samsung Carnival: फ्लिपकार्टवर 34 हजार रुपयांपर्यंतच्या सॅमसंगच्या स्मार्टफोनवर मिळतेय दमदार सूट
Samsung (Photo Credit: Fortune)

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर सॅमसंग कार्निवल सेलची सुरुवात झाली आहे. हा सेल तीन दिवस सुरु राहणार असून 14 डिसेंबर त्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे जर ग्राहकांना सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असल्यास ही योग्य संधी आहे. कारण यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी A50, गॅलेक्सी नोट 10, नोट 10+, गॅलेक्सी S9, 9+ आणि गॅलेक्सी A20s सह अन्य स्मार्टफोनवर दमदार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे कंपनीच्या स्मार्टफोनवर सूट दिली जात असल्याची संधी हातातून जाऊ देऊ नका.

कंपनीच्या या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी A50 या स्मार्टफोनची सुरुवाती किंमतींवर 6001 रुपयांची सूट देत ग्राहकांना तो 14,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये 25mp फ्रंट कॅमेरासह 4gb रॅम दिला आहे. त्याचसोबत गॅलेक्सी नोट 10+ मधील 256जीबी असणारा स्मार्टफोन 79,999 रुपये आणि 512जीबी असलेला स्मार्टफोन 89,99 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्मार्टफोन खरेदीसाठी ICICI बँकेचा डेबिट कार्डने पेमेंट करु शकतात. कंपनीच्या या स्मार्टफोनवर तब्बल 6 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.(खुशखबर! Flipkart वर महागडा iPhone फक्त 14 हजार199 रुपयांत)

 त्याचसोबत गॅलेक्सी एस9 या हा स्मार्टफोन 34,501 रुपयांचा असून त्यावर सूट दिल्यास 27,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी A70s या स्मार्टफोनवर 2001 रुपयांची सूट दिली जात असून तो 28,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. सॅमसंग कंपनीच्या गॅलेक्सी A50s स्मार्टफोन 19,999 रुपयांना खरेदी करता येणार असून 6जीबी वेरियंटसाठी ग्राहकांना 21,999 रुपये मोजावे लागणार आहेत.