सावधान! अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone हॅक होण्याचा सर्वाअधिक धोका-रिपोर्ट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

2019 च्या वर्षात डेटा चोरी आणि फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आल्याचे दिसून आले आहे. गेल्या काळापासून सर्वात सुरक्षित मानला जाणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुद्धा हॅकिंगचे प्रकार घडले आहेत. तर व्हॉट्सअॅप मध्ये बग आढळून आल्याने हॅक करणे सोपे होत याचा फटका जगभरातील 1400 लोकांना बसला. तर ब्रिटेन मधील संशोधकांनी नुकत्याच एका रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनला हॅक करण्याचा सर्वाधिक धोका आहे. कारण हॅकर्स बहुतांश प्रमाणात आयफोन धारकांचा डेटा चोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात.

युके येथील case24.com यांनी संशोधकांनी महिन्याभरातील गुगल सर्चच्या आधारे एक डेटा जमा करत याबाबत अधिक खुलासा केला आहे. त्यांना या डेटामध्ये असे दिसून आले की, विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला हॅकर्स सहज हॅकिंग करतात. तर ब्रिटेन येथे 10,040 आयफोन युजर्सला हॅकर्सनी टार्गेट केले असून ते अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन सॅमसंगच्या दुप्पट आहे. हॅकर्सकडून 700 सॅमसंग स्मार्टफोन हॅकिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे ही त्यांनी सांगितले असून हॅकिंगच्या बाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे.(Online Fraud Case: ऑनलाईन फसवणुकीच्या संख्येत वाढ; या पद्धतीने केली जाते अनेकांची लूट)

कंपनीने ब्रिटेन मधील एकूण 12, 310 युजर्सचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक कसे केले जाईल याचे सुद्धा रिसर्च केले आहे. युजर्सकडून फेसबुक, अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स सारखे अॅप कसे हॅक करता येईल याचा शोध घेतला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये अॅपलने आयफोन युजर्ससाठी एक नवा पॅच जारी केला असल्याने तो अधिक सुरक्षित असून हॅकिंग पासून बचाव करेल असे म्हटले आहे.