Airtel Launches 5G Services in Pune: एअरटेलने पुण्यात सुरू केली 5G सेवा; शहरातील 'या' भागातील लोक घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद
Airtel (PC - Twitter/ANI)

Airtel Launches 5G Services in Pune: आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेल (Bharti Airtel)ने शुक्रवारी पुण्यात 5G सेवा सुरू केली. Airtel 5G Plus सेवा ग्राहकांना टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. कारण कंपनी आपले नेटवर्क तयार करत असून रोल-आउट पूर्ण करत आहे. दूरसंचार कंपनीने सांगितले की, 5G सक्षम उपकरण असलेले ग्राहक रोल-आउट अधिक व्यापक होईपर्यंत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हाय-स्पीड एअरटेल 5G प्लस नेटवर्कचा आनंद घेतील.

Airtel ची 5G सेवा सध्या कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, बाणेर, हिंजवडी, मगरपट्टा, हडपसर, खराडी, मॉडेल कॉलनी, स्वारगेट, पिंपरी चिंचवड आणि इतर काही निवडक ठिकाणी कार्यरत आहेत. कंपनीने सांगितले की, एअरटेल त्याचे नेटवर्क वाढवेल आणि वेळेत शहरभर त्याच्या सेवा उपलब्ध करून देईल. (हेही वाचा - Airtel 5G Plus: आठ शहरांमध्ये लॉन्च झाले 'एअरटेल 5जी नेटवर्क'; मिळणार 30 पट वेगवान स्पीड, जाणून घ्या सविस्तर)

महाराष्ट्र आणि गोव्याचे भारती एअरटेलचे सीईओ जॉर्ज मॅथेन म्हणाले की, “पुण्यात एअरटेल 5G प्लस लॉन्च करण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. एअरटेलचे ग्राहक आता अल्ट्राफास्ट नेटवर्कचा अनुभव घेऊ शकतात. ग्राहक सध्याच्या 4G स्पीडपेक्षा 20-30 पट वेगवान स्पीडचा आनंद घेऊ शकतात.” (हेही वाचा  - Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी आणले खास Smart Missed Call Alerts फिचर्स; यूजर्संना 'असा' होणार फायदा)

दरम्यान एअरटेलने सांगितले की, ते एअरटेल ऑफर करत असलेल्या सेवांच्या संपूर्ण पोर्टफोलिओला चालना देतील. याशिवाय, ते हाय डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, फोटोंचे त्वरित अपलोडिंग आणि बरेच काही करण्यासाठी सुपरफास्ट प्रवेशास अनुमती देतील. या लॉन्चसह, दूरसंचार फर्मने सांगितले की Airtel 5G Plus शिक्षण, आरोग्य सेवा, उत्पादन, कृषी, गतिशीलता आणि लॉजिस्टिकमध्ये क्रांती घडवून आणेल.