देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेल (Bharti Airtel) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी 'स्मार्ट मिस्ड कॉल अलर्ट' (Smart Missed Call Alerts) फिचर आणले आहे. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते त्यांचे सिम नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर गेल्यावर मिस्ड कॉल अलर्ट पाहण्यास सक्षम असतील. याअगोदर Jio ने ही सुविधा आपल्या वापरकर्त्यांना प्रदान केली आहे. एअरटेल स्मार्ट मिस्ड कॉल अॅलर्ट वापरकर्ते जेव्हा एअरटेल थँक्स अॅपवर जातील, तेव्हा त्यांना तेथे मिस्ड कॉल अॅलर्ट विभागात आलेले मिस्ड कॉल दिसतील.
स्मार्ट मिस्ड कॉल अॅलर्ट ही खरोखरच एक अत्यंत आवश्यक सेवा आहे. जिचा वापर एअरटेल वापरकर्त्यांना नक्कीच होणार आहे. अनेकदा आपण नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असतो. अशावेळी खूप तातडीचे कॉल आपल्याला येत असतात. परंतु, आपल्याकडे स्मार्ट मिस्ड कॉल अॅलर्ट नसल्याने आपल्याला ते मिस्ड कॉल्स आलेले कळत नाहीत. कारण, त्याची मिस्ड कॉलची सूचना मिळत नाही. (हेही वाचा - WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपने आणणार नवीन फीचर; आता यूजर्स PC, Laptop आणि Phone वर डाउनलोड करु शकणार चॅट बॅकअप)
मात्र, आता एअरटेल यूजर्संची ही समस्या संपली आहे. कारण, आता स्मार्ट मिस्ड कॉल अलर्टसह, वापरकर्ते सिम नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असल्यास प्रत्येक मिस्ड कॉल पाहण्यास सक्षम असतील.
एअरटेलच्या प्रत्येक वापरकर्त्याला मिळणार सुविधा -
तुम्ही एअरटेल मोबाईल ग्राहक असल्यास, तुम्ही प्रीपेड वापरकर्ता असाल किंवा पोस्टपेड वापरकर्ते असाल, तर तुम्ही एअरटेल थँक्स अॅपवरून स्मार्ट मिस्ड कॉल वैशिष्ट्याचा लाभ घेण्यास सक्षम असाल. सक्रिय व्हॉईस कॉलिंग कनेक्शन असलेला कोणताही एअरटेल वापरकर्ता या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.
एअरटेलपेक्षा जिओची सुविधा अधिक सोयीची -
वर नमूद केल्याप्रमाणे, रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना ही सेवा आधीच मिळत आहे. जेव्हा डिव्हाइस कव्हरेजच्या बाहेर असते, तेव्हा जिओ आपल्या ग्राहकांना मिस्ड कॉल्सबद्दल थेट एसएमएसद्वारे सूचित करते. प्रत्येक वेळी अॅप तपासण्यापेक्षा हे वैशिष्ट्य अधिक सोयीचे आहे.