एअरटेलने सादर केली BlueJeans नावाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा; JioMeet, Zoom शी होणार टक्कर
Airtel BlueJeans Video Conferencing Platform Launched in India (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला यशस्वी करण्यासाठी भारतीय कंपन्यांनी कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपले स्वदेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप जिओ मीट (Jio Meet) लॉन्च केले. यानंतर आता भारती एअरटेल (Bharti Airtel) या आणखी एक टेलिकॉम कंपनीने आपले स्वदेशी व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप सादर केले आहे. BlueJeans असे याचे नाव असून, त्याद्वारे कंपनी झूम, मायक्रोसॉफ्ट टीम, गुगल मीट यासारख्या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप्सना आव्हान देईल. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु वेबसाइटच्या यादीमध्ये या नवीन सेवेच्या प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली आहे.

JioMeet हे एंटरप्रायझेस आणि ग्राहक अशा दोघांसाठी उपलब्ध आहे, मात्र एअरटेलची ही नवीन सेवा सध्या तरी फक्त एंटरप्रायझेससाठीच उपलब्ध असेल. लिस्टिंगनुसार, एअरटेलची BlueJeans सुविधा प्रारंभी तीन महिन्यांसाठी विनामूल्य चाचणीसाठी उपलब्ध असेल. चाचणी कार्यान्वित करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचे तपशील भरून एअरटेल साइटवर नोंदणी करावी लागेल, त्यानंतर 24 तासात विनामूल्य चाचणी कार्यान्वित होईल. एअरटेलशिवायही आपण थेट BlueJeans द्वारे सदस्यता घेऊ शकता. मात्र, यामध्ये आपण एअरटेल आपल्या ऑफरमध्ये देत असलेल्या काही वैशिष्ट्यांपासून वंचित राहू शकता. (हेही वाचा: Airtel व Vodafone Idea ला TRAI चा झटका; ब्लॉक केले ‘हे’ प्रीमियर प्लान्स, जाणून घ्या कारण)

एअरटेल BlueJeans दावा करते की ही सेवा, उत्तम हाय-ग्रेड सुरक्षासह येईल. यासह, रिअल-टाइम मीटिंग्स एनालिटिक्स, लाइव्ह मीटिंग कंट्रोल इत्यादी काही अन्य वैशिष्ट्ये देखील उपस्थित असतील. OnlyTech च्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्यांना डायल-इन ऑप्शन देखील मिळेल, ज्याची सुरुवात 0.50 पैसा प्रति कॉलने होईल. याव्यतिरिक्त, Airtel Audio Bridge इंटीग्रेट केले आहे, जेणेकरून Pay-per-use मॉडेलवर भारत आणि आंतरराष्ट्रीय डाईल इन सपोर्ट अनेबल केला जाईल.