ऑनलाइन सिक्युरिटी फर्म (Online Security Firm) मॅकॅफीने (McAfee) एका अहवालात म्हटले आहे की, सर्वेक्षण केलेल्या सुमारे अर्ध्या भारतीयांनी सांगितले की ते एखाद्या व्यक्तीचा खरा आणि क्लोन केलेला (Real and Cloned Voice) आवाज यात फरक करू शकत नाहीत तर व्हॉईस स्कॅमच्या बळींपैकी 83 टक्के लोकांना पैशाचे नुकसान सहन करावे लागले आहे. मॅकॅफीने सांगितले की, एकूण सात देशांत 7,054 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात भारतातील 1,010 उत्तरदात्यांचा समावेश आहे. ज्यातील बहुतांश नागरिकांना खरा आवाज आणि क्लोन केलेला आवाज यांतील फरक समजू शकला नाही. ज्यामुळे अनेक नागरिक व्हाईस स्कॅमचे बळीही ठरले आहेत. व्हॉईस स्कॅमपासून संरक्षणात्मक उपायांपैकी एक म्हणून कुटुंबातील सदस्य आणि विश्वासू जवळच्या मित्रांमध्ये मौखिक कोडवर्ड वापरले जावेत असे हा अहवाल सूचवतो.
"सुमारे अर्ध्या (47 टक्के) भारतीय प्रौढांनी AI व्हॉईस स्कॅमचा अनुभव घेतला आहे किंवा एखाद्याला ओळखले आहे, जे जागतिक सरासरी (25 टक्के) पेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. 83 टक्के भारतीय पीडितांनी सांगितले की त्यांचे नुकसान झाले आहे. पैशाचे - 48 टक्क्यांनी 50,000 रुपयांपेक्षा जास्त तोटा," अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्यांसाठी आव्हान; IBM कडून नोकरभरतीसंदर्भात वेगळा विचार )
मॅकॅफीने पुढे म्हटले आहे की, सुमारे 47 टक्के भारतीय प्रौढांनी AI व्हॉईस स्कॅमचा अनुभव घेतला आहे. जे जागतिक सरासरी (25 टक्के) पेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत. भारतीय पीडितांनी सांगितले की त्यांचे नुकसान झाले आहे. हे सांगणाऱ्यांचे प्रमाण 83 टक्के आहे. यापैकी 48% लोकांनी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा फटका सहन केला आहे.
McAfee ने एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करण्यासाठी फक्त तीन सेकंदांच्या ऑडिओसह ऑनलाइन व्हॉईस स्कॅम्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान कसे वाढवत आहे यावर एक सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की अर्ध्याहून अधिक (69 टक्के) भारतीयांना वाटते की त्यांना AI आवाज आणि वास्तविक आवाज यातील फरक माहित नाही किंवा ते सांगू शकत नाहीत. सर्वेक्षणात 66 टक्के भारतीयांनी सांगितले की ते एखाद्या मित्राकडून किंवा पैशाची गरज असलेल्या प्रिय व्यक्तीकडून व्हॉइसमेल किंवा व्हॉइस नोटला उत्तर देतात.