World Cup 2019: तुम्हाला जमणार नाही हे! IND vs NZ सामना लांबणीवर गेल्याने चाहत्यांनी उडवली ICC ची खिल्ली
(Photo Credits: Getty Images)

इंग्लंड मध्ये होणाऱ्या पावसामुळे क्रिकेट चाहत्यांची मात्र निरास होत आहे. आत्त्तापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले असून दोन सामने काही कमी षटकांचे खेळवण्यात आले होते. भारत आणि न्यूझीलंड मधील सामनाही अजून सुरु झालेला नाही अशामुळे दोन्ही देशातले चाहते आयसीसी वर भडकले आहे. इंग्लंडमधल्या वातावरणाची माहिती असूनही आयसीसी ने असे नियोजन केलेच कसे असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. सोशिअल मीडिया वर याची कसून निंदा केली जात आहे. (IND vs NZ, ICC World Cup 2019: पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही, सांगतो हर्षा भोगले)

आयसीसी मूर्ख आहे, मैदान झाकता येत नाही का? पुढच्या वेळीस आयसीसी ने काळजी घ्यावी, विश्वकप स्पर्धेतील सर्वात वाईट आयोजन आयसीसी ने केले आहे असेही च्छते म्हणाले. यंदाच्या विश्वकप स्पर्धेसाठी आयसीसी ने चुकीच्या देशाची निवड केली आहे असेही चाहत्यांच म्हणणं आहे. पावसामुळे निराश झालेल्या काही चाहत्यांनी तर आयसीसी ला नवीन उपाय सुद्धा सुचवलेत. ते जरी अंमलात आणण्यासारखे नसले तरीही आयसीसी ला मोठी चपराक दिल्यासारखे आहे.

<मैदानाला दोन भागात विभागून द्या, दोन्ही संघांपैकी जो पहिले मैदान सुखावेल तो विजेता.

टॉस जिंकून प्रथम तैराकी कोण करेल. हे विश्व कप तैराकी चॅम्पियनशिपमध्ये रुपांतर केल्यास चांगले 

वर्ल्डकप च्या लोगो वर छत्री