World's Most Admired Men 2020: विराट कोहली (Virat Kohli) हा क्रिकेट विश्वातील जागतिक सुपरस्टार आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोहली सातत्याने गुंतलेला असतो, कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर. भारतीय कर्णधाराने त्याच्या जागतिक प्रसिद्धीचे आणखी एक चांगले उदाहरण समोर ठेवले आहे. त्याने आपल्या लोकप्रियतेत वाढ करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एका सर्वेक्षणानुसार विराटने जगातील सर्वाधिक प्रशंसनीय (World's Most Admired) 20 लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. हे सर्वेक्षण YouGov ने केले असून त्यात कोहलीव्यतिरिक्त आणखी तीन भारतीय पुरुषांचा समावेश आहे कोहलीव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि बॉलीवूड बादशाह शाहरुख खान यांचा समावेश आहे. महिलांच्या यादीत प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांना सामील करण्यात आले आहे. (IPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी RCB कर्णधार विराट कोहलीने शेअर केली मोटिवेशनल पोस्ट, पाहून तुम्हीही सहमत व्हाल View Post)
दुसरीकडे, YouGov ने त्यांची जगातील सर्वाधिक प्रशंसनीय लोकांची वार्षिक यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांचा देखील समावेश झाला आहे. मात्र, रोनाल्डो पुन्हा एकदा मेस्सीच्या वरचढ राहिला. रोनाल्डो हा जगातील सर्वात प्रिय खेळाडू आहे. रोनाल्डो सहाव्या क्रमांकावर असून मेस्सी 11व्या स्थानावर आहे. तर भारताचा एकमेव खेळाडू विराटने 16वे स्थान मिळवले. फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी मेस्सी अर्जेटिनाच्या राष्ट्रीय संघात प्रवेश करण्यासाठी बार्सिलोना सोडेल तर रोनाल्डो टुरिनच्या बाजूने Serie A मध्ये खेळताना दिसेल. दरम्यान, या यादीनुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अजूनही हृदयांवर राज्य करत आहेत आणि त्यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले. भारतीय दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथे, विराट कोहली 16 व्या क्रमांकावर आहे आणि सर्वाधिक प्रशंसित भारतीय खेळाडू आहे.
World's Most Admired Men 2020 (1-10)
1. Barack Obama 🇺🇸
2. Bill Gates 🇺🇸
3. Xi Jinping 🇨🇳
4. Narendra Modi 🇮🇳
5. Jackie Chan🇨🇳
6. Cristiano Ronaldo 🇵🇹
7. Jack Ma🇨🇳
8. Dalai Lama
9. Elon Musk 🇿🇦
10. Keanu Reeves 🇨🇦https://t.co/4nO3Jrs2Sk pic.twitter.com/mBItMzKcLx
— YouGov (@YouGov) September 25, 2020
महिलांच्या यादीत मिशेल ओबामा अव्वल, अँजेलीना जोली दुसऱ्या, ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयने तिसरे स्थान मिळवले आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांनी अनुक्रमे 15 आणि 16वे स्थान पटकावले आहे. टॉप-२० मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आणि अमेरिकेची पहिली महिला मेलानिया ट्रम्प यांचाही समावेश आहे.