भारताचे माजी क्रिकेटपटू वसंत रायजी यांनी केली वयाची सेन्चुरी, सचिन तेंडुलकरने 100 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
सचिन तेंडुलकर, स्टीव्ह वॉ आणि वसंत रायजी (Photo Credits: Twitter/Sachin Tendulkar)

सर्वात ज्येष्ठ रणजी क्रिकेटपटूंपैकी एक वसंत रायजी (Vasant Raiji) आज, 26 जानेवारी 2020 रोजी 100 वर्षांचे झाले आहे. रायाजी सर्वात जुने जिवंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू आहे.  त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करतानाच एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिन आणि स्टीव्ह वॉ सह रायजींचा 100 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जम्न 26 जानेवारी 1920 मध्ये बडोदा येथे झाला होता. उजव्या हाताने फलंदाजी करणारे राईजींनी क्रिकेट कारकिर्दीत 1940 ते 1950 च्या दरम्यान 9 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 277 धावा केल्या. आज ते 100 वर्षांचे झाले आहे. रायाजी मुंबई आणि बरोडा संघाकडून क्रिकेट खेळले आहे. शिवाय, जेव्हा ते इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले तेव्हा तेथेही क्लब क्रिकेट खेळले.रायजी क्रिकेट इतिहासकार देखील आहेत.त्यांनी गोलंदाजी करण्याचाही प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. कर्नल सीके नायडू हे रायजींचे आवडते क्रिकेटपटू आहेत.

रायजींच्या वाढदिवसानिमित्त तेंडुलकर आणि वॉ दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी गेले. याच भेटीचा व्हिडिओ सचिनने शेअर केला. ट्विटरवर करताना सचिनने लिहिले, "श्री वसंत रायजी, तुम्हाला 100 खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्टीव्ह आणि मला भूतकाळातील काही आश्चर्यकारक क्रिकेट कथा ऐकण्यात खूप मजा आली. आमच्या लाडक्या खेळाविषयीच्या आठवणींचा खजिना घालून दिल्याबद्दल धन्यवाद." पाहा हा व्हिडिओ:

आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून वसंत रायजीच्या 100 व्या वाढदिवशी त्यांचे अभिनंदन केले आहे. 1941 बॉम्बे पेंटाँगुलर क्रिकेट स्पर्धेत रायजी हिंदू संघाचे राखीव फलंदाज होते.