Mohammad Amir & Harbhajan Singh (Photo Credit - Instagaram)

टी-20 विश्वचषक (T20 Worldcup) स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर रविवारी भारताला हार पत्कारावी लागल्यानंतर, माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने (Mohammad amir) सोशल मीडियावर हरभजन सिंगची (Harbhajan singh) खरडपट्टी काढली.

आमिरने सोमवारी ट्विटरवर विचारले, "हरभजन पा जी ने टीव्ही तो नई तोडा ?" ज्याचा अर्थ "हरभजनने त्याचा टीव्ही तोडला का?" वर्ल्ड कपच्या मागील सामन्यानंतर भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांचे टेलिव्हिजन सेट तोडल्याबद्दल भारतीयांच्या टोमणेवर ही टिप्पणी करण्यात आली होती.

आमिरच्या ट्विटला उत्तर देताना हरभजने लिहिले, ‘लॉर्ड्सवर नो बॉल कसा झाला? किती घेतले आणि कोणी दिले? कसोटी क्रिकेटमध्ये नो बॉल कसा असू शकतो? तुम्हाला आणि तुमच्या बाकीच्या सहकाऱ्यांना लाज वाटायला हवी, तुम्ही या सुंदर खेळाला बदनाम केले.”

हरभजने पुन्हा ट्विट करत म्हटले आहे की अश्या लोकांशी बोलन म्हणजे घाणरडे आहे.  यानंतर भज्जीने त्या सामन्याची क्लिप शेअर केली, ज्यामध्ये त्याने मोहम्मद आमिरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

या दरम्यान मोहम्मद आमिरनेही हरभजनला उत्तर दिले आहे. “तू खूप मस्त आहेस, माझ्या भूतकाळाबद्दल बोलत आहेस, पण हे तथ्य बदलणार नाही की तुला आधी तीन गोष्टींचा सामना करावा लागला. आता विश्वचषक जिंकताना पहा. वॉक ओव्हर तर मिळाला नाही, जा पार्कमध्येच वॉक करा,” असे आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्सने विजय नोंदवला. त्यामुळे आता पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठणे आता जवळपास निश्चित दिसत आहे.