ऋषभ पंत (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक झळकावून चर्चेचा विषय बनला आहे. ऋषभ पंतने कठीण परिस्थितीत फलंदाजी करताना 111 चेंडूत 146 धावा केल्या आणि त्याच्या खेळीत 20 चौकारांसह 4 षटकारांचा समावेश आहे. यासह ऋषभ पंतने जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) अतिशय खास विक्रम मोडला आहे. ऋषभ पंतने आपल्या डावात पहिल्या षटकारासह हे विशेष स्थान गाठले. ऋषभ पंतने वयाच्या 24 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकले आहेत. आता ऋषभ पंत 100 आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज बनला आहे.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वयाच्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैनाचे नाव येते, ज्याने वयाच्या 25 वर्षे 7 दिवसात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. त्याच्या या खास खेळीने ऋषभ पंतने एमएस धोनीचा विक्रमही मोडला आहे. आता भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा पंत हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. हेही वाचा IND vs ENG: भारताचा सलामीवीर शुभमन गिलला अधिक शिस्तबद्ध राहण्याची गरज, रवी शास्त्रींचे वक्तव्य
पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचवेळी धोनीने 2005 मध्ये 93 चेंडूत शतक झळकावले आणि हा विक्रम आपल्या नावावर केला. दुसरीकडे, एजबॅस्टन कसोटीबद्दल बोलताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. एकवेळ भारताने 98 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. मात्र, पंतसह जडेजाने भारताचा डाव सांभाळला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 7 गडी गमावून 338 धावा होती.