भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Disqualified) हिस पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये महिला कुस्तीच्या (Women's Wrestling) 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे. आंतरराष्ट्रीय मानक आणि ऑलिम्पिक नियमांनुसार (lympic Disqualification) या गटात खेळण्यासाठी तिचे वजन 50 किलोंपेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्याने तिच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. धक्कादायक म्हणजे केवळ काहीच ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अंतिम स्पर्धेतून बाद व्हावे लागले. महिलांच्या भारतीय कुस्ती संघाने (Indian Wrestling Team) सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज (7 ऑगस्ट) सकाळी फोगटचे वजन 50 किलोच्या मर्यादेपेक्षा किंचित जास्त झाले.
अपात्रतेचे तपशील
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अपात्रतेची पुष्टी केली. तसेच, घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. याच वेळी असोसिएशनने विनेश फोगटसाठी हा काळ कठीण असला तरीही तिने गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगटच्या अपात्रतेचा अर्थ असा की, ती रौप्यपदकासह कोणत्याही पदकासाठी पात्र राहणार नाही. आता 50 किलो गटात फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेतेच राहतील. (हेही वाचा, Paris Olympics 2024: अंतिम फेरीत धडक मारत घडवला इतिहास विनेश फोगटने घडवला इतिहास; भारतासाठी पदक केले निश्चित)
वजन संघर्ष आणि प्रयत्न
सूत्रांनी सांगितले की, फोगट हे अनुज्ञेय वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम होते. मंगळवारच्या लढतींसाठी वजन कमी करूनही, कुस्तीपटूंनी स्पर्धेच्या दोन्ही दिवशी त्यांची वजन श्रेणी राखली पाहिजे असा नियम आहे. फोगट,सहसा 53 किलो गटात स्पर्धा करते, तिला 50 किलोच्या मर्यादेत राहण्याचे कठीण आव्हान सांभाळायचे होते. मंगळवारी रात्री, तिचे वजन अंदाजे 2 किलो जास्त होते आणि तिने संपूर्ण रात्र जॉगिंग, स्किपिंग आणि सायकलिंगद्वारे अतिरिक्त वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतू, अंतीम क्षणी नियतीने तिला दगा दिलाच. (हेही वाचा, Rahul Gandhi Congratulates Vinesh Phogat: 'चैम्पियंस अपना जवाब मैदान से देते हैं...'; विनेश फोगटच्या शानदार विजयानंतर राहुल गांधींचे भावनिक ट्विट)
एक्स पोस्ट
Indian Wrestler Vinesh Phogat disqualified from the Women’s Wrestling 50kg for being overweight.
It is with regret that the Indian contingent shares news of the disqualification of Vinesh Phogat from the Women’s Wrestling 50kg class. Despite the best efforts by the team through… pic.twitter.com/xYrhzA1A2U
— ANI (@ANI) August 7, 2024
स्पर्धेवर परिणाम
फोगटची अपात्रता हा भारतासाठी एक महत्त्वपूर्ण धक्का आहे. ती ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून आणि युक्रेन आणि क्युबाच्या कुस्तीपटूंवर डावपेच जिंकून हे यश मिळवले. फायनलमध्ये फोगटचा सामना सारा हिल्डब्रँड हिच्याशी होणार होता. फोगटच्या अपात्रतेसह, हिल्डब्रँडला सुवर्णपदक प्रदान केले जाईल.
फेडरेशन विचार करेल
#WATCH | Delhi: On Indian wrestler Vinesh Phogat's disqualification from #ParisOlympics2024, BJP MP Karan Bhushan Singh says, "It is a loss for the country. The Federation will take this into consideration and see what can be done" pic.twitter.com/lSntbFF3kv
— ANI (@ANI) August 7, 2024
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरविल्याबद्दल भाजप खासदार करण भूषण सिंग यांनी, "हे देशाचे नुकसान आहे. फेडरेशन हे विचारात घेईल आणि काय करता येईल ते पाहील", अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, केवळ काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे एखाद्या खेळाडूस आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून बाद व्हावे लागते हा प्रकार गंभीर आहे. या प्रकाराचे तीव्र पडसाद संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. लोकसभेमध्ये सभागृहाील सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, असे कशामुळे घडले यावाबत केंद्रीय क्रीडामंत्री आज दुपारी तीन वाजता सभागृहात निवेदन सादर करणार असल्याचे समजते.