सानिया मिर्झा-इरफान पठाण (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी सोशल मीडियावर यूजर्सना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.सानिया आणि इरफान, दोघांनी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे लोकांना घरीच राहून सण साजरा करण्यासाठी आवाहन केले. रमजानचा पवित्र महिना 24 एप्रिल रोजी म्हणजेच चंद्रा दर्शनासह सुरू झाला आहे. चंद्र दर्शनानंतर लोकांनी एकमेकांना रमजानसाठी शुभेच्छा दिल्या. रमजान महिना येताच लोकांच्या चेहऱ्यावर चमक येते, पण यंदा कोरोना व्हायरस आणि त्याहूनही लॉकडाउनमुळे (Lockdown) सर्व सण-उत्सव घरात साजरे होत आहेत. सर्व मशिदी मौलवींनी मुस्लिम समाजातील लोकांना घरात नमाजचे पाच वेळा पठण करण्यासाठी आणि तारावीह व इफ्तारी करण्याचे आवाहन केले आहे.रोजा, इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे.या काळात त्यांना सकाळी सूर्योदयापूर्वी आणि रात्री सूर्यास्तानंतर अन्न पाणी घेण्याची मुभा असते. (Ramzan Mubarak 2020 Wishes & Greetings: रमजान उल करीम उत्सवाला लवकरच होणार सुरुवात; WhatsApp Status, HD Images आणि Stickers च्या माध्यमातून सर्वांना द्या या खास शुभेच्छा)

जगभरातील भक्त सामान्यत: मशिदींमध्ये नमाज सादर करतात, परंतु कोरोनाच्या प्रसारामुळे धार्मिक स्थळांसह सर्व काही 3 मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. म्हणून सानिया आणि इरफानने चाहत्यांना घरामध्येच राहण्यास सांगितले. सानियाने चाहत्यांना लोकांच्या आरोग्यासाठी आणि जगभर शांती व प्रेमासाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले. पाहा:

इरफानचा व्हिडिओ संदेश:

दिवसभाराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सायंकाळी लीलाल समितीने चंद्र दर्शन करण्याची घोषणा केली. 30  दिवस चालणारा हा पवित्र सण म्हणजे रमजान उल मुबारकमधील अल्लाहच्या उपासनेचा सण आहे. या महिन्याची सांगता रमजान ईद ने होते. त्यादिवशी सारे जण एकत्र येतात. गोडा-धोडाच्या पदार्थांसोबत एकमेकांना ईदी देतात. रमजानमध्ये संपूर्ण 30 दिवस मशिदी आणि लोकांची घरे दिव्यांनी प्रजवलीत होतात, परंतु कोरोनासारख्या संकटामुळे मशीदही सध्या ओसाड झाली आहे. सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाचा रमजानच्या सण नागरिकांनी घरीच साजरा करावा असे आवाहन धर्मगुरुंनी केले आहे.