बॅडमिंटन भारतात इतके चांगले काम करत असेल तर त्यामागील एक मोठे कारण म्हणजे पुल्लेला गोपीचंद (Pullela Gopichand) आहे. होय, गोपीचंद किंवा कोच गोपीचंद म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताच्या या माजी बॅडमिंटनपटूने भारताला 2 ऑलिम्पिक पदके जिंकण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या या माजी बॅडमिंटनपटूने खेळाडू म्हणून ऑलिम्पिक पदक जिंकले नसले तरीही, एक प्रशिक्षक म्हणून त्यांनी सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनला एक ओळख निर्माण करून दिली आहे. बॅडमिंटनविश्वात 'सुपर कोच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुलेल्ला गोपीचंद यांचा 46 वा वाढदिवस आहे. गोपीचंद यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1973 आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील नागंदला येथे झाला. एक खेळाडू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट आहेत, परंतु प्रशिक्षक म्हणून त्यांच्या उत्कटतेने त्यांना 'गुरु गोपी' हा सन्मान मिळवून दिला आहे.
एक खेळाडू म्हणून, प्रकाश पादुकोण (Prakash Padukone) आणि सय्यद मोदी (Sayed Modi_ यांची भारतीय बॅडमिंटन परंपरा पुढे नेण्याचे काम गोपीचंद यांनी केले. आज त्यांचा 46 वा वाढदिवस आहे, या निमित्ताने त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या...
1. गोपीचंदने बॅडमिंटनमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे, पण लहान असताना त्यांना क्रिकेट खेळायची खूप आवड होती. पण बॅडमिंटन बहुधा त्यांच्या नशिबात लिहिले गेले होते. गोपींना क्रिकेटपटू व्हायचे होते, पण त्यांच्या भावाने त्यांने बॅडमिंटन खेळण्यास प्रोत्साहित केले आणि आज सर्वच पाहत हे कुढे पोचले आहेत. त्याच्या घरी फक्त त्यांनाच खेळाची आवड नव्हती, त्यांचा भाऊही एक हुशार खेळाडू होता. गोपी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की मी आणि माझा भाऊ दोघेही बॅडमिंटन खेळायचो. त्यांचा भाऊ राज्याचा चॅम्पियन होता. ते दहा वर्षाचे असताना बॅडमिंटन खेळण्यात हुशार बनले आणि त्यांच्या चर्चा शाळेत सुरू झाली.
2. बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंना फार कमी यश मिळाले आहेत. आजवर माजी खेळाडू प्रकाश पादुकोण यांचे नाव भारतीय बॅडमिंटनमध्ये आदराने घेतले जाते. गोपींनी खेळाडू म्हणून मिळालेल्या यशात पादुकोण यांची महत्वाची भूमिका आहे. पादुकोण यांनी गोपींचं कोच म्हणून काम केले आहेत. म्हणून यात शंका नाही की गोपींनी 2001 मध्ये पादुकोणनंतर दुसऱ्यांदा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप (All England Championship0 जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम सामन्यात चीनच्या चेन हॉंगला 15-12,15-6 असे पराभूत करून ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली.
3. प्रशिक्षक म्हणून त्यांनी अधिक कामगिरी केली आहे. त्यांनी 2008 होते जेव्हा पुलेला गोपीचंद यांनी एकेडमी सुरू केली होती, तेव्हा त्यांचे एकाच ध्येय होते भारतीय बॅडमिंटनला सर्वात उंचीवर नेणे. या अकादमीने भारताला सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यासारखे सर्वोत्कृष्ट खेळाडू दिले आहेत. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने ऐतिहासिक कामगिरी करत बॅडमिंटनमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले, तर सिंधूने 2016 मध्ये पुन्हा पहिले रौप्य पदक जिंकत देश आणि गोपींचा मान वाढवला.
4. 1996 ते 2000 पर्यंत गोपीचंदने सलग पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. यानंतर त्यांना 1999 मध्ये अर्जुन पुरस्कारा आणि 2009 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
5. आपल्या वडिलांची परंपरा कायम ठेवत गोपीचंद यांची मुलगी गायत्री गोपीचंदही बॅडमिंटन खेळते. गायत्री सध्याची अंडर -13 राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन आहे. शिवाय, त्यांचा मुलगा विष्णू सध्या गोपीचंद अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
गोपीचंदने 2003 मध्ये बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. आणि संपूर्ण जीवन भारतीय क्रिकेटचे स्तर वाढवण्यासाठी ते झटत आहे. गोपीचंदच्या नेतृत्वात भारताला अव्वल दर्जाचे खेळाडू मिळाले आहेत आणि अनेक खेळाडू तयारही होत आहेत.