
Khelo India Youth Games 2019: पुण्यात 'खेलो इंडिया युवा स्पर्धे'ला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या क्रीडापटूंनी किमया घडवून आणली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राने तब्बल 57 पदकांची कमाई केली आहे. या विशेष कामगिरीमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.
महाराष्ट्राने आतापर्यंत या स्पर्धेत 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 23 कांस्य अशा एकूण 57 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली, हरियाणा या राज्यातील खेळाडूंनी विशेष कामगिरी केली आहे. दिल्लीच्या खेळाडूंनी 13 सुवर्णपदकांसह 36 पदकांची कमाई केल्याने दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. तर 12 सुवर्णपदकांसह 40 पदकांची कमाई करत हरयाणा तिसऱ्या स्थानावर आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा 2019, पुण्यातील बालेवाडी येथे आजपासून सुरु; महाराष्ट्राचा क्रीडा विभाग मात्र उदासीन
20 तारखेपर्यंत सुरु असणाऱ्या या स्पर्धेत पुढे काय होणार, महाराष्ट्र आपलं अव्वल स्थान टिकवण्यात यशस्वी होणार का? याकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांच्याकडून अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत.