प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक राम लाल यादव (Cricket Coach Ram Lal Yadav) यांच्यावर वाराणसी येथील (Varanasi) डीएव्ही इंटर कॉलेज (DAV Inter College) आवारात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. ही घटना आज (सोमवार, 1 मे 2023 ) सकाळी घडली. हल्ल्यामध्ये 62 वर्षीय यादव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कबीरचौरा येथील रहिवासी राम लाल यादव उर्फ दादा डीएव्ही कॉलेजमध्ये क्रिकेट प्रशिक्षक आहेत.
वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, रामलाल यादव हे आज सकाळी कॉलेज आवारात पोहोचले. या वेळी मुखवटाधारी दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पळ काढला.पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पोलीस हल्लेखोरांच्या मागावर आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही जमा करुन ते स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे. हल्ल्याचे कारण अद्यापही पुढे येऊ शकले नाही. रामलाल यादव हे सकाली फिरण्यासाठी आले असता ही घटना घडली, असेही पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Wrestlers Protest: काही लोकांचा या निषेधाला 'प्रक्षोभक आंदोलन' म्हणून मांडण्याचा प्रयत्न, बजरंग पुनियाचे वक्तव्य)
अधिक माहिती अशी की, गोळीबाराची घटना घडल्यानंतर डीएव्ही इंटर कॉलेजमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. कबीरचौरा येथील रहिवासी राम लाल यादव उर्फ दादा डीएव्ही कॉलेजमध्ये क्रिकेट प्रशिक्षक आहेत.
रामलाल यादव हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी साडेपाच वाजता ते डीएव्ही कॉलेजच्या मैदानावर पोहोचले. यादरम्यान हल्ला करणाऱ्या दोन हल्लेखोरांनी आधी राम लाल यांच्यावर गोळीबार केला. पोटाच्या वरच्या भागात गोळी लागल्याने ते जागीच रक्तबंबाळ होऊन खाली पडले.
ट्विट
Cricket coach Ram Lal Yadav was shot at by miscreants at the DAV Inter College campus in #Varanasi.
"The matter is being investigated and we have yet to ascertain the motive behind the incident." said a senior police official. pic.twitter.com/zKhg0AZFk6
— IANS (@ians_india) May 1, 2023
Cricket coach Ram Lal Yadav was shot at by miscreants at the DAV Inter College campus in #Varanasi.
"The matter is being investigated and we have yet to ascertain the motive behind the incident." said a senior police official. pic.twitter.com/zKhg0AZFk6
— IANS (@ians_india) May 1, 2023
दरम्यान, हल्लेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत कॉलेजच्या फाटकातून पळ काढला. माहिती मिळताच राम लालचे कुटुंबीय आणि कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. रामलालला तातडीने मालदहिया येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.