'83' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत रणवीर सिंह याने English Premier League मध्ये आर्सेनल क्लबसाठी गायले रॅप, पहा व्हायरल व्हिडिओ
रणवीर सिंह (Photo Credit: @Arsenal/Twitter)

आपल्या आगामी '83' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून असलेला अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh), रविवारी उत्तर लंडनच्या डर्बी येथे फुटबॉल सामन्यात दिसला. रणवीरने हा सामना पाहताना त्याचा रंगीबेरंगी पोशाखात सर्वोत्तम परिधान केला होता. शिवाय, इथे तो रॅप करत आणि नाचताना देखील दिसत होता. ज्याने त्याने सर्व फुटबॉल चाहत्यांची मनं जिंकली. रणवीर तेथे आर्सेनल (Arsenal) आणि टॉटेनहॅम (Tottenham) दरम्यान स्थानिक फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेला होता. रणवीरने याबाबत ट्विटकरत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली. रणवीरने त्याच्या सोशल मीडियाअकाउंटवर काही फोटोज शेअर केले. यातील एका फोटोत तो मैदानात तर दुसऱ्यात तो स्टँड्समध्ये उभा राहिलेला दिसत आहे. फोटो शेअर करत रणवीरने कॅप्शन देत लिहिले की, "भव्य # इमिरेट्सस्टॅडियम @प्रीमियरलीग @ आर्सेनल (एसआयसी) मधील पिचसाइड."(दीपिका पादुकोण हिच्यापूर्वी कतरिना कैफ हिची चित्रपट '83' साठी केली होती निवड?? जाणून घ्या सत्य)

रणवीरने शेअर केलेल्या फोटोजमध्ये तो निळ्या आणि लाल रंगाच्या थ्री-पीस सूटमध्ये दिसत आहे. शिवाय, फुटबॉल क्लब आर्सेनल ने आपल्या सेलेब्रिटी फॅनचा एक व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले: “@RanveerOfficial #AARSTOT च्या घरात आहे." पहा हा व्हायरल व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Pitchside at the magnificent #EmiratesStadium ♥️⚽️ @premierleague @arsenal

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आर्सेनल व्हिडिओ

रणवीर लंडनमध्ये '83' चित्रपटाच्या शूटिंगसाठी असून आता चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. रणवीरने लंडनमध्ये झालेल्या शूटिंगच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना रणवीरने लिहिले- "वेळापत्रक संपले आहे. चीअर्स." दरम्यान, '83' चित्रपटासाठी रणवीरने महिने क्रिकेट खेळण्याचा साराव केला आहे. रणवीर नेहमी स्वत:च्या पात्रासाठी मेहनत घेतो. रणवीरने या चित्रपटासाठीदेखील कसलीही कसर सोडली नाही. जुलै महिन्यात त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपटामधील त्याचा पहिला लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर अगदी कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

& that’s a schedule wrap, folks ! 🇬🇧 CHEERS😎🥂 @83thefilm 🏏🏆

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on