दीपिका पादुकोण हिच्यापूर्वी कतरिना कैफ हिची चित्रपट '83' साठी केली होती निवड?? जाणून घ्या सत्य
कतरिना कैफ, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण (Photo Credits: Instagram)

रणवीर सिंह (Ranveer Singh) याचा आगामी चित्रपट '83' पुढील वर्षात 10 एप्रिल 2010 मध्ये सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परंतु सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. तसेच रणवीर सिंह या चित्रपटातून झळकणार असून त्याचा लूकसुद्धा प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला आहे. या लूकमध्ये रणवीर कपिल देव (Kapil Dev) यांच्यासारखा दिसून येत आहे. '83' चित्रपटामध्ये चक्क दीपिका पादुकोण (Deepika Padukone) रणवीरची पत्नी म्हणून काम करणार आहे. दरम्यान असे वृत्त समोर आले होते की, दीपिका पूर्वी पत्नीची भुमिका कतरिना कैफ (Katrina Kaif) करणार असल्याचे बोलले जात होते. परंतु या वृत्तावर कतरिना हिने सत्य सांगितले आहे.

कतरिना कैफ हिने असे म्हटले आहे की, 83 चित्रपटासाठी तिला विचारण्यात आले नव्हते. एका मुलाखती दरम्यान कतरिनाने असे सांगितले की, कबीर खान यांचा चित्रपट '83' साठी माझ्यासोबत कोणतेच बोलणे झाले नसून याबद्दल काहीच माहिती नाही.

या चित्रपटात ताहिर राज भसिन, साकिब सलीम, एमी वर्क, साहिल खट्टर, चिराग पाटील आणि हार्डी सिंधू हे सर्वजण मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 1983 मधील वर्ल्ड कपमध्ये भारताने विजय मिळवत विश्वविजेता म्हणून आपले नाव ट्रॉफीवर कसे कोरले याची कथा मांडण्यात आली आहे.(म्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल)

कतरिना हिच्याबद्दल बोलायचे झाल्यास जून महिन्यात भारत चित्रपटातून ती सलमान खान याच्यासोबत झळकली होती. त्यामध्ये सुनील ग्रोवर, दिशा पाटनी सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून आले. तर लवकरच कतरिना तिचा आगामी चित्रपट सूर्यवंशी मधून अक्षय कुमार याच्यासोबत काम करताना दिसणार आहे. 27 मार्च 2020 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.