म्हातारपणी असे दिसतील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह; फोटो सोशल मीडियात व्हायरल
Deepika Padukone and Ranveer Singh (Photo Credit : Twitter)

बॉलिवूडचे हॉट आणि लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone)-रणवीर सिंह (Ranveer Singh) हे नेहमीच चर्चेत असतात. दोघांचे फॅन फोलोईंग देखील जबरदस्त आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. त्याचबरोबर त्यांचे फॅन क्लबही सोशल मीडियावर भलतेच अॅक्टीव्ह असतात. अलिकडेच रणवीर-दीपिकाच्या फॅनक्लब अकाऊंटवरुन शेअर झालेला एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांचा 'छपाक' सिनेमातील Kissing Scene लीक (Viral Video)

हा फोटो जरा हटके आहे. रणवीर-दीपिकाचे आताचे लूक चाहत्यांना घायाळ करतात. तर अनेकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र दीपवीरची ही जोडी म्हातारी झाल्यावर म्हणजे अगदी 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल? कधी कल्पना केली आहे. नसेल केली तरी ही जोडी कशी दिसेल याची उत्सुकता तुमच्या मनात नक्कीच असेल. तर त्यांच्या फॅनपेजवरील हा ओल्ड लूक असलेला फोटो पाहून तुम्हाला त्याचा अंदाज नक्कीच येईल. रणवीर सिंह याचे चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, '83' सिनेमातील 'कपिल देव'च्या लूक मधील फोटो केला शेअर (See Post)

पहा फोटो:

दीपवीरचा हा ओल्ड लूक ओल्ड फिल्टरचा वापर करुन एडिट केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपवीर ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर झालेल्या तीन रिसेप्शन पार्टीपैकी एका पार्टीतील हा लूक आहे. दीपवीरच्या या ओल्ड लूकवर अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

रणवीर सिंह सध्या '83' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यात तो माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पदुकोण लवकरच 'छपाक' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.