Happy Birthday Ranveer singh: रणवीर सिंह याचे चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, '83' सिनेमातील 'कपिल देव'च्या लूक मधील फोटो केला शेअर (See Post)
Ranveer Singh Shares First look as Kapil Dev (Photo Credits: Instagram)

Ranveer Singh Birthday Special:  Bollywood मधील एनर्जीची खाण म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर सिंह  (Ranveer Singh) याचा आज वाढदिवस, त्यामुळे फॅन्सनी रात्रीपासूनच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरवात केली आहे, या सर्व चाहत्यांचे आभार मानत रणवीरने देखील काही वेळापूर्वी त्यांना रिटर्न गिफ्ट देऊन खुश केले आहे. आपल्या खास दिवसाच्या निमित्ताने  रणवीरने आज सोशल मीडियावरून '83 ' या  सिनेमातील स्वतःचा लूक शेअर केला आहे. यामध्ये रणवीर भारतीय क्रिकेटची शान म्ह्णून ख्यात असलेल्या कपिल देव (Kapil Dev)यांच्या लूक मध्ये पाहायला मिळत असून  हा फोटो फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.

रणवीर ने शेअर केलेल्या या लूक मध्ये तो टेस्ट क्रिकेट मधील पांढऱ्या रंगाच्या जर्सीत बॉल फिरकावताना पाहायला मिळत आहे, या पोस्ट खाली त्याने 'मी माझ्या खास दिवशी तुमच्यासोबत हरियाणाच्या हुरिकेन कपिल देवच्या लूक मधील फोटो शेअर करत आहे " असे म्हंटले आहे.अवघ्या काहीच तासात हा फोटो सर्व माध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे. '83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो

पहा कपिल देव यांच्या लूक मधील रणवीर सिंहची झलक

दरम्यान बाजीराव रणवीर सिंह  केवळ लूक मधूनच नाही तर अभिनयातून सुद्धा कपिल देव साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या या तयारीचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला होता. 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता, 83  या सिनेमात त्या वेळेसचा इंडियन टीमचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग सोबत दीपिका पादुकोण सुद्धा एक कॅमिओ रोल साकारणार आहे.