'83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो
Ranveer Singh (Photo Credits: Twitter)

सध्या बॉलिवूड विश्वात चर्चा सुरु आहे ती अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या आगामी चित्रपट '83' या सिनेमाची. रणवीर ने या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कॅमियो रोल करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी कानावर आली होती. मात्र आता रणवीर सिंहने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन दीपिका चे '83' चित्रपटाच्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. इतकंच नव्हे तर दीपिका पादुकोण रणवीरला बॅटने मारत असल्याचा एक बुमरँग व्हिडियो देखील शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Good times in Glasgow! 😂🤣😅 #83squad @83thefilm 🏏🎥🎞 @deepikapadukone @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

View this post on Instagram

 

Story of my Life 😅 Real & Reel ! @deepikapadukone @83thefilm 🏏🎥🎞

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आपल्या पत्नीवर अतोनात प्रेम करणा-या रणवीर या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ''माझ्या पत्नीचा भूमिका माझ्या पत्नीशिवाय अजून कोण चांगली करु शकेल?" इतकच नव्हे तर रणवीर ने दीपिका पादुकोण, दिग्दर्शक कबीर खानसोबतचे फोटो ही शेअर केले आहेत.

हा दीपिका आणि रणवीर चा चौथा चित्रपट असेल. या आधी दीपिका आणि रणवीर ने गोलियों की रासलीला-रामलीला (Goliyon ki Raasleela Ram-Leela), बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) आणि पद्मावत (Padmavat) यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

दीपिका पादुकोण-रणवीर सिंह ही जोडी पुन्हा झळकणार एकत्र, क्रिकेटविश्वावर आधारित चित्रपटात दीपिका करणार कॅमियो रोल

तर दीपिकाने ही भावनिक दृष्ट्या तिच्याशी जोडल्या 'छपाक' चित्रपटाचेही शूटिंग पुर्ण केले आहे.