दीपिका पादुकोण-रणवीर सिंह ही जोडी पुन्हा झळकणार एकत्र, क्रिकेटविश्वावर आधारित चित्रपटात दीपिका करणार कॅमियो रोल
Deepika Padukone-Ranveer Sing | (Photo courtesy: archived, edited images)

गोलियों की रासलीला-रामलीला (Goliyon ki Raasleela Ram-Leela), बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) आणि पद्मावत (Padmavat) यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) ही गोड जोडी पुन्हा एकदा आपली अफलातून केमिस्ट्री '83'या चित्रपटाच्या माध्यमातून सादर करणार आहेत. मात्र यावेळी दीपिका पादुकोण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावणार आहे. या चित्रपटात दीपिका व्यतिरिक्त आणखी ब-याच कलाकार केमियो रोल करणार आहेत.

या विषयी अधिक खुलासा करत डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, दीपिका पादुकोण सुद्धा या चित्रपटाशी लवकरच जोडली जाणार आहे. या चित्रपटात क्रिकेटर्सची भूमिका साकारण्यासाठी अनेक अभिनेत्यांची नावे समोर आली होती. त्यानंतर आता दीपिकाचे नाव सुद्धा समोर आले आहे.

नुकतेच दीपिकाचे तिच्या आगामी चित्रपट 'छपाक' चे शूटिंग पुर्ण केले. छपाक हा चित्रपट तिच्यासाठी खूपच भावनिक असा चित्रपट आहे. यात ती एका ऍसिड हल्ला झालेल्या पीडित तरुणीची भूमिका साकारत आहे.

'83' सिनेमातील आदिनाथ कोठारेची पहिली झलक! 

दीपिका '83' मध्ये जरी केमियो भूमिका करत असली तरीही, या चित्रपटाशी जोडण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होईल.