'83' सिनेमातील आदिनाथ कोठारेची पहिली झलक! (Photo)
83 The Film | Adinath Kothare | Photo Credits: Twitter

भारताने 1983 साली वर्ल्डकप (World Cup) जिंकला आणि क्रिकेट विश्वात इतिहास रचला. आता हाच इतिहास रूपेरी पडद्यावर लवकरच दिसणार आहे. कबीर ख़ान  (Kabir Khan)  यांच्या दिग्दर्शनाखाली साकारणार्‍या या बॉलिवूड सिनेमामध्ये चिराग पाटील (Chirag Patil) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हे दोन मराठमोळे चेहरे झळकणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. या सिनेमात दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेत असलेल्या आदिनाथ कोठारेने आज सिनेमातील त्याची पहिली झलक रसिकांसोबत शेअर केली आहे.

आदिनाथ कोठारे ट्विट

‘83’ ची स्टार कास्ट

वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचं नेतृत्त्व कपिल देव यांनी केलं होतं. सिनेमामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग झळकणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. '83' हा सिनेमा  10 एप्रिल 2020 दिवशी रिलीज होणार आहे