आदिनाथ कोठारे याची बॉलिवूडमध्ये एंट्री; '83' मध्ये साकारणार 'दिलीप वेंगसरकर' यांची भूमिका
Film 83 Cast (Photo Credits: Twitter)

Film 83 Star Cast: मराठी सिनेसृष्टीमध्ये 'चॉकलेट बॉय' इमेज असलेला आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. '83’ ' या कबीर खान (Kabir Khan) दिग्दर्शित हिंदी सिनेमामध्ये आदिनाथ कोठारे भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरांच्या (Dilip Vengsarkar) भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमामध्ये कपिल देव (Kapil Dev)  यांच्या भूमिकेत रणवीर सिंह आहे. तर आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा मराठी अभिनेता त्याचे वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आज या सिनेमामधील कलाकारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

आदिनाथ कोठारे ट्विट

भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली लंडनच्या लॉर्ड्स वर वर्ल्डकप जिंकला होता. या विजयी कामगिरीची चाहत्यांना पुन्हा सिनेमाद्वारा भेट घडवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने ही विजयी कामगिरी कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली केली होती.

‘83’ ची स्टार कास्ट

‘83’ या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे.

लवकरच या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. 10 एप्रिल 2020 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.