बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या स्टाईलसोबतच त्याच्या अभिनयाचे देखील अनेक फॅन्स आहेत. कोणतीही भूमिका निभावण्यासाठी तो घेत असलेली मेहनत वाखाण्यासारखी आहे. सध्या तो त्याच्या आगामी सिनेमा '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळेसचा इंडियन टीमचा प्रवास (Indian Cricket Team) या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रणवीर जीवातोड मेहनत घेत असून त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. (आदिनाथ कोठारे याची बॉलिवूडमध्ये एंट्री; '83' मध्ये साकारणार 'दिलीप वेंगसरकर' यांची भूमिका)
खुद्द रणवीर सिंगने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात कपिल देव यांचा फलंदाजी आणि गोलंदाजीचा अंदाज शिकण्यासाठी रणवीर घेत असलेले परिश्रम दिसून येतात. हा व्हिडिओ शेअर करत रणवीर सिंगने लिहिले की, "भारतीय क्रिकेट टीमचा सर्वात मोटा विजय जो आतापर्यंत दाखवण्यात आला नाही."
पहा व्हिडिओ:
'83' या सिनेमात ताहिर राज भसिन, साकिब सलीम, एमी वर्क, साहिल खट्टर, हार्डी संधू त्याचबरोबर आदिनाथ कोठारे, चिराग पाटील यांसारख्या मराठमोळ्या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कबीर खान दिग्दर्शित 83 हा सिनेमा 10 एप्रिल 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.