सुशांत सिंह राजपूत, तैमूर अली खान (Photo Credit: Facebook/Instagram)

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajpur) याने 14 जून रोजी मुंबईच्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 34 वर्षीय अभिनेत्याच्या अशा धक्कादायक निधनामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहे. सुशांतच्या मृत्यू मागे बॉलीवूडमधील नेपोटिजमला सर्वाधिक जबाबदार मानले जात आहे. अनेक अभिनेते, निर्मात्यांवर सोशल मीडियावर यूजर्सकडून कसून टीका केली जात आहे. सुशांतच्या मृत्यूला आता दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना त्याच्या मृत्यूबद्दलची अधिक माहिती अपेक्षित आहे, मात्र असे होत नसल्याने टीम इंडियाचा फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwary) यांनी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर टीका केली आहे. मनोजने प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त केला आणि म्हणाला की, तैमूर अली खान याच्या बातम्यांना अधिक महत्व देण्यापेक्षा सुशांतच्या मृत्यूबद्दलची माहिती अधिक गांभीर्याने माहिती द्यावी. (अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरूच राहणार; कुटुंबीयांनी घेतला महत्त्वाचा निर्णय)

मनोजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुशांतचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाला, "प्रसारमाध्यम तैमूर अली खानला जितक्या प्रमाणात कव्हरेज देते, माझी इच्छा आहेन्यूज चॅनेल्सने झोपेतून जागे व्हावे आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला कव्हर करण्यास सुरवात करावी. प्राइम टाइमवर त्याच्यासाठी एकही डिबेट नाही. राष्ट्राला हे जाणून घ्यायचे आहे."

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येबाबत मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सुशांतशी संबंधित सुमारे 25 जणांची पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला आहे ज्यामध्ये मृत्यूचे कारण गुदमरल्यासारखे म्हटले आहे. याशिवाय त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे जखम किंवा ओरखडे नाहीत. दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय त्याच्या नावाने एका फाऊंडेशनची स्थापनादेखील करणार आहे. यासंदर्भात माहिती देताना त्याच्या कुटुंबीयाने सांगितलं, "तुमच्यासाठी सुशांत सिंह राजपूत आणि आमच्यासाठी आमचा एकुलता एक मुलगा. मोकळ्या मनाचा, बडबडा आणि हुशार. मोठ-मोठी स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्याची हौस. सुशांतजवळ कायम एक दुर्बणी असायची. त्याला शनि ग्रह पाहण्याची फार आवड होती. आता त्याचं खळखळून हसणं पुन्हा कधीचं आमच्या कानावर पडणार नाही. हे समजण्यासाठी आम्हाला कित्येक वर्ष लागतील. विज्ञानाविषयी प्रत्येक गोष्ट सांगण्याची त्याची धडपड, उत्सुकता आता परत कधीच आम्हाला पाहायला मिळणार नाही."