IND vs WI 2nd Test Day 3: रिषभ पंत याच्याकडून महेंद्र सिंह धोनी याचा Fastest 50 Dismissal विक्रम मोडीत
Rishabh Pant And MS Dhoni (Photo: Getty Image)

भारतीय संघाचा युवा खेळाडू रिषभ पंतने ( Rishabh Pant) भारताचा सर्वोकृष्ट यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडीत काढला आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीज (India vs West Indies) पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभने यष्टीरक्षक म्हणून मोठा विक्रम नोंदवला आहे. महेंद्र सिंह धोनीने यष्टीमागे राहून १५ कसोटी सामन्यात ५० खेळाडू बाद केले आहेत. मात्र, भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने धोनीचा हा विक्रम मोडीत काढून केवळ ११ सामन्यात ५० खेळाडू बाद केले आहे.

भारत विरुद्ध वेस्टइंडीज (IND vs WI 2nd Test) संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा सामन्यात तब्बल तीन भारतीय खेळाडूंनी विक्रम केला आहे. जसप्रीस बुमराह(Jasprit Bumraha), इशांत शर्मा (Ishant Sharma) याच्यानंतर रिषभ पंतनेही या विक्रमांच्या यादीत समावेश केला आहे.

रिषभ पंत याने महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मोडीत काढून ऑस्ट्रेलियाचा यशस्वी यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गिलक्रिस्ट यानीही यष्टीमागे राहून ११ सामन्यात ५० खेळाडूंना बाद केले होते. महत्वाचे म्हणजे, गिलक्रिस्ट हा सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. गिलक्रिस्ट याच्या विक्रमाशी बरोबर करत रिषभ पंतने चांगली कामगिरीचे लक्षणे दाखवले आहेत. रिषभच्या पाठोपाठ जॉनी बेयरेस्टो(Jonny Bairstow), टीम पेन ( Tim Paine), बाउचर (Baucher) यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे देखील वाचा-IND vs WI 2nd Test Day 3: इशांत शर्माने आशिया खंडाबाहेर रचला इतिहास, कपिल देव यांचे विक्रम मोडीत

सध्या रिषभ पंतने त्याच्या चाहत्यांना निराश केले होते. यामुळे अनेकांनी त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. रिषभ हा युवा खेळाडू आहे. त्याला जास्त सामन्याचा अनुभव नाही. आणखी काही सामने खेळल्यानंतर रिषभ स्वत: मध्ये बदल घडवून आणेल, अशी अनेकांकडून अपेक्षा केली जाते.